STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Inspirational

4  

Varsha Fatakale warade

Inspirational

आम्ही शिवरायांचे भक्त

आम्ही शिवरायांचे भक्त

1 min
202

प्रजाहितदक्ष क्षत्रियकुलवंत 

सळसळते ज्यासांठी रक्त

स्वराज्य प्रणेते कर्तव्य दक्ष

आम्ही शिवरायांचे भक्त


गनिमी कावा शत्रूस नामोहरम 

रणनीती, कौशल्य, पराक्रमी थोर

स्वकीयासही केले शासन ज्यांनी

शत्रूला नाव घेताच जीवाला घोर


युद्धनीती,कुटनीती संघर्षाचा संगर

वचक मोगल आदिलशाहीस सत्वर

मावळे गर्जती हर हर महादेव

वेचिला जीव स्वराज्यासाठी निरंतर


धर्मरक्षणकर्ता, निरपेक्ष,न्यायी 

मातृभक्त सह्याद्रीचा धगधगता निखारा

रयतेचा राजा ओजस्वी तारा

कर्तुत्वाने दुमदुमतो आसमंत सारा


संस्कारी,शौर्यशाली, गरिबांचा वाली

स्त्रियांचा आदर हिरकणीचा सन्मान

संस्थापक मराठा साम्राज्याचे आदर्शवान

शिवबा आमचा राजा आम्हा अभिमान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational