STORYMIRROR

Ratnakar Koli

Inspirational

3  

Ratnakar Koli

Inspirational

आम्ही आमचा वर्तमान.

आम्ही आमचा वर्तमान.

1 min
27.4K


इतिहासाचा शोध घेऊन बोध घेता येतो असं म्हणणाऱ्या मतलबी सुधारकांनो

 इथं तर प्रतिशोध घेणारे उभे आहेत

 चौकाचौकात हातात बंदुका घेऊन 

कोण? कुणाचा? केव्हा? 

मुडदा पाडेल याचा भरोसा नाही यत्किंचितही...

वाड्यापासून पाड्यापर्यंत 

सारेच आग ओकतायेत आपल्या मुखामुखातून

अमक्याचा अमका वाद 

तमक्याचा तमका वाद 

वादच वाद पेटलाय वस्त्या वस्त्यातून 

पुतळ्यांच्या नेतृत्वाखाली 

अन पेरलं जातंय विष

 हरेक माणसाच्या नसानसात

 इतका राजरोसपणे चाललाय

 तुमचा गोरखधंदा

दिवसा विरोध अन् रात्री एकाच ताटात भाकरी मोडणाऱ्या पाखंडी सुधारकांनो 

आता आमच्यात देखील आलीये समज 

आपसातले वाद सामोपचाराने मिटवून घ्यायची

 तेव्हा चुलीत घाला तुमचा तो वादग्रस्त इतिहास आम्ही आमचा वर्तमान जगायला समर्थ आहोत....




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational