*आलो तुझ्या गावी..*
*आलो तुझ्या गावी..*
आज खूप दिवसानी मी आलो तुझ्या गावी
मन माझं केलंय मी आता फक्त तुझ्या नावी..
शहरात मन माझं लागणा काही
तुझ्याविना या जीवाला काही चैनच नाही..
आठवण तुझी मला छळतेय ग राणी
या वाऱ्यासारखी आहे माझी प्रेम कहाणी..
खेडे गावात राहते या पवन ची मैना
तुझ्यासाठी झाली माझ्या या मनाची दैना..
खाल्लेला घास काही लागणा माझ्या या अंगा
तुझ्या प्रेमाचा माझ्यावर चढलाय पक्का रंग हा..
तुझ्यासाठी लातूर शहर सोडून हे माझं
जातोय मी माझ्या प्रेमाच्या गावी..
माझ्या दिलाच्या दिलासाठी..
आज मी आलो तुझ्या गावी....

