STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

3  

Sarika Jinturkar

Fantasy Others

आला पाऊस

आला पाऊस

1 min
284

विजांचा कडकडाट,

ढगांचा गडगडाट

पक्षांचा किलबिलाट,

विजांचा लखलखाट 

आला पाऊस मुसळधार


सुटला सोसाट्याचा वारा

घेऊन आल्या सोबत गारा  


गर्द शिवार झाले, नदी - नाले ओथंबले

पानापानांवर झळकले मोती

इंद्रधनुने रंग उधळले नभोमंडपी  


गारठली संध्याकाळ

झाली हिरवी चिंब पायवाट 

चोहीकडे गर्द हिरवे रान झाले 

गंध मातीचा सुटला


आला पाऊस मुसळधार 

धारा पावसाच्या अंगावरती

झेलून मी ही मग

थोडा आनंद लुटला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy