STORYMIRROR

Shobha Wagle

Romance Classics Fantasy

4  

Shobha Wagle

Romance Classics Fantasy

आला आला पाऊस

आला आला पाऊस

1 min
406

आला आला पाऊस आला

ओली चिंब झाली धरा

मृग नक्षत्राच्या येण्याने

पाऊस पडला छान बरा


सोसाट्याचा वारा सुटला

तांडव नृत्य झाले वृक्षांचे

पाला-पाचोळा उडाला

गोंधळ उडाले लोकांचे


ढगांचा तो कडकडाट

विजेचा ही चकचकाट

काळे मेघ बरसले धरा

केला त्यांनी थयथयाट


बळीराजा सुखावला

पेरणी कामी तो लागला

ढवळ्या पवळ्या संगती

नांगरणी करू लागला


डोंगर कपारीतुनी वाहू लागले

लहान मोठे झरे शुभ्र पाण्याचे

अवनी ही सजली नटली छान

नेसुनी शालू हिरव्या बुट्यांचे


रिमझीम पाऊस तो बरसावा

मन सोक्त पावसात चिंब भिजावे

स्वतःस विसरुनी रिमझीम पावसात

मस्त मस्त ते गावे अन् नाचावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance