STORYMIRROR

Alka Rasal

Abstract

3.4  

Alka Rasal

Abstract

आजी आजोबा

आजी आजोबा

1 min
14K


आजी आजोबा गेल्यापासून

उखळ-मुसळ दिसत नाही

जातं शोधायला गेले

तेही सापडत नाही ॥1॥

बंब आणी घंगाळ

अंघोळीला नाही

काठवटील्या भाकरीला

चुलच पेटत नाही॥2॥

धान्य पाखडायला गेले

सूपच सापडत नाही

पाट्यावरचा वरवंटा

झेपतच नाही॥3॥

खूप बोलावसं वाटल तरी

ऐकायला कुणीच नाही

आठवणीतला मामचा गाव

स्वप्नातसुद्धा येत नाही॥4॥

सुखदुःखाच्या आठवणींनी

अंतःकरण होतं जड

उन्मळून पडलाय हो

आमचा आधारवड॥5॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract