STORYMIRROR

Alka Rasal

Abstract

2  

Alka Rasal

Abstract

जीवनाची घडी

जीवनाची घडी

1 min
14K


ओलांडली साठी

तरी हाती नाही काठी

व्यायाम आणी आहार

यादी नाही मोठी ॥1॥

वाचनाची गोडी

साखर खातो थोडी

चवीने खातो

फळांच्या फोडी॥2॥

मित्रपरिवार मोठा

वादाला फाटा

फिरून सर्व आलो

स्वप्नपूर्तीच्या वाटा॥3॥

ओलांडत गेलो

जीवनाचा टप्पा

कधी नाही विसरणार

पारावरच्या गप्पा॥4॥

संसाराचा रथ

दोघांनीही चालवला

वयाचं भान आहे

जीवनरूपी गाडीला॥5॥

अविरत कष्टाची

सवय होती छान

प्रामाणिक वृत्तीला

जगी मोठा मान॥6॥

भजन आणी किर्तन

मनाला विरंगुळा

आधाराला आहे

जीवलगांचा गोतावळा ॥ 7॥

कुटूंबात आहे

मानाचं स्थान

जीवनात अनुभवलं

सुख आणि समाधान ॥ 8॥

विचारचक्रांना सुट्टी

आयुष्याच्या शेवटी

भरभरून घेतल्या

प्रियजनांच्या गाठी॥9॥

उभयतांनी बसवली

जीवनाची घडी

भगवंत नामाची

मुखी होती गोडी ॥ 10॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract