जुन्या वळणाची माणसं
जुन्या वळणाची माणसं
सत्कर्म करीत राहिले
अपेक्षा नाही कशाची
जुन्या वळणाची माणसं
खरच होती दूरदृष्टीची॥1॥
अन्यायाची होती चीड
कष्टाचा ध्यास
जिवनविषयक विचार
होते त्यांचे खास॥2॥
कोर्टकचेरीची पायरी
वाटे त्यांना अनिष्ट
साधी राहणी उच्च विचार
ध्येयाशी होते एकनिष्ठ ॥ 3॥
हवामानाचा अंदाज
अचूक त्यांना माहिती
निसर्गाच्या चक्रानुसार
पिकवत होते शेती॥4॥
रामायण -महाभारताची
कथा तोंडपाठ
ज्ञानेश्वरी गाथेसह
मनी जपला हरिपाठ॥5॥
रितीरिवाज सणवार
सांगड विज्ञानाची
मायेच्या ओलाव्याने
नाती जपली जिव्हाळ्याची॥6॥
मायेचा वाहता झरा
खरंच आटत चाललाय
सहानुभूतीच्या प्रेमाला
प्रत्येक जण भुकेला॥7॥
थरथरणा-या हातांना
मायेचा हवा आधार
जन्म मृत्यूच्या चक्रातून प्रत्येक जण जाणार॥8॥
गावगाड्यात त्यांचा
मोठा होता दरारा
सीसीटिव्ही, पोलिसांचा
कुठेच नव्हता पहारा॥9॥
आधारवडाच्या छायेत
सर्व होते सुखी
फेसबुक आणी वायफायच्या
जगात सर्व दुःखी॥10॥
