STORYMIRROR

Manik Nagave

Tragedy

4  

Manik Nagave

Tragedy

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

1 min
402

भेडसवतात समाजाला रोज,

प्रश्न आजच्या काळापुढील.

पाहून जीव वेडावून जातो,

पट्टी बांधलेल्या देवतेपुढील.


रोज नवी आव्हाने पेलताना,

मानव मेटाकुटीला आलाय.

समस्येवरील उपाय शोधताना,

खचून बेजार तो झालाय.


अन्याय,अत्याचार रोजच चाललेत,

सामान्य जनतेला नाही कुणी वाली.

मतदानाचा गठ्ठा टिकवण्यासाठी,

रोजच्या आखतात नव्या चाली.


बेकार फीरतोय दारोदारी,

घेऊन हाती पदवी शिक्षणाची.

ससेहोलपटच चाललीय त्याची,

कींमत नाही त्याच्या ज्ञानाची.


स्रीभ्रूणहत्या तर सर्रास चालते,

हुंड्यासाठी लाडकी बळी जाते.

सोशिकतेचा अंत जवळ आलाय,

भारतमाता सर्वांना याचना करते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy