STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

आजची स्त्री

आजची स्त्री

1 min
273

भपुर्वीच्या काळी पडद्यामागे असणारी ती

आज आकाशी उंच भरारी घेतेय

पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून

स्वत:च्या पायावर उभी राहतेय

स्वावलंबी जीवन जगतेय...

सर्व अभिव्यक्तीनुसार वेशभूषा बदलतेय

आजची स्त्री मुक्तपणे जगतेय

त्या दिवसात सुद्धा घरात वावरतेय

रूढी,परंपरेच्या बेड्या तोडून

निसर्गाचे वरदान आहे सिध्द करत...

आजची स्त्री आव्हाने पेलतेय

स्व कर्तृत्वाने स्वत:ला सिध्द करतेय...

आचार विचारांचं स्वातंत्र्य,न्याय,हक्क

अधिकार,समानतेने मागतेय...

हर एक क्षेत्र व्यापून टाकतं

स्वत:चा ठसा उमटवतेय.....

गुलामगिरीची बंधने बाजूला सारून

स्वत:चं अस्तित्व शोधतेय....

राजकारणात धाडसाने पाऊल ठेवतेय

आजची स्त्री ताठ अभिमानाने जगतेय...

सावित्री-ज्योतिबानी पाजलेले बाळकडू

सोबतीला घेऊन संविधानाच्या जोरावर

हर एक क्षेत्र व्यापून टाकतेय....

आजची स्त्री मजल दरमजल करत

स्वत:च स्वत:ची वाट शोधतेय...

काळानुरूप बदल सर्वात:मध्ये करत

आजची स्त्री मुक्तपणे जगतेय...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational