आजची स्त्री ही कशी असावी
आजची स्त्री ही कशी असावी
आईच्या नजरेत ती शिस्तबद्ध असावी की स्वच्छपणे बागडणारी असावी?
बाबांच्या इच्छेने ती बंधनात असावी की स्वप्नांचे पंख घेउन आकाशात उंच भरारी घेणारी असावी?
भावाची कायम ती पाठराखण असावी की मैत्रिण बनून समजून घेणारी असावी?
ताईची नेहमी ती कामे ऐकणारी असावी की मदतीस धावून जाणारी असावी?
काकू-अत्या-मामीची वेणी-फणी करून देणारी असावी की आज मला कंटाळा आला म्हणून टाळून देणारी असावी?
मोठे काका-मामा घरात आहेत म्हणून हळू आवाजात बोलणारी असावी की ते कुठे बाहेरचे आहेत असे म्हणून टीव्हीचा आवाज तेवढाच ठेवणारी असावी?
नवर्यासाठी ती दिवसभर घरकाम करणारी असावी की त्याच्या बरोबरीने व्यवसाय/नोकरी करणारी असावी?
सासरच्या 'आदर्श सुनेच्या चौकटीत' ती बसणारी असावी की थोडी चौकट मोडणारी पण असावी?
आईचे कर्तव्य आहे म्हणून ती सतत मुलांसाठी धावणारी असावी की आज मुले त्याचे बाबा सांभाळणार असे म्हणून बिनधास्त असावी?
समाजात वावरताना ती जुनाट रूढी पाळणारी असावी की बदलत्या काळाबरोबर चालणारी असावी?
ती अशी असावी का किंवा ती तशी असावी का, प्रश्न अनेक उत्तर मात्र एकच
ती कशी पण असावी, फक्त तिला वाटेल ती तशी असावी.
