आईशप्पथ जादू झाली
आईशप्पथ जादू झाली
ती माझ्या
जीवनात आली
आईशप्पथ
जादू झाली || 0 ||
तिलाही मी
आवडतो
असाच प्रेम
इतिहास घडतो
ती माझ्या
प्रेमात नहाली
आईशप्पथ
जादू झाली || 1 ||
प्रेम माझं
होतं खरं
काहीतरी
घडलं बरं
होता देव
माझा वाली
आईशप्पथ
जादू झाली || 2 ||
मी तिला
केला प्रपोज
तिने केला
नाही ऑपोज
आलं हसू
तिच्या गाली
आईशप्पथ
जादू झाली || 3 ||