आई
आई
आई तुझ्या असण्यामुळे
आहे मिळाला जन्म हा
शतदा जरी फेडू तरी
कमी पडेल माझा यत्न हा
तू वेचिल्या कष्टांची
गायिली जरी महती
नाही कशासी होते
त्याची तरीही गणती
हातासी धरुनी तू
शिकवलीस मम भाषा
संस्कार ही दिले तू
दाखवलीस मम दिशा
सांभाळले मला तू
जीवाच्या पलीकडे
फेडू कसे तुझे मी
हे पांग हेच कोडे
तू ऐकमेव आहे
वात्सल्य-त्याग-मूर्ती
हा जन्म वाहीला मी
तुझ्याच पावलांवरती
