STORYMIRROR

Jyoti Kale

Inspirational

3  

Jyoti Kale

Inspirational

आई

आई

1 min
241

मम जन्माने मातापिता आनंदले

पहिलेच फुल वेगळे निपजले

परी तयांनी डोळ्यांना थांबवले

सगळे त्यांच्या आनंदात सहभाग ले

पंधराव्या दिवसापासून खडतर प्रवास सुरु केला

नावा सरल वेगळेवाकडे वळण आयुष्याला

मग तूच माझा सगळा जड बुटासह भारवाहिला

मुंबापुरी मग पुणे प्रवास करीत देह बहु कष्टविला

जिच्यामुळे मी आज जगात माझ्याच पायावरी चालले

जड बुटासह मला उचलुनी तू दवाखाने पार केले

तव आयुष्य माझ्याच साठी वेचले,जग हसले

कष्ट मनाची तोड नाही जगात कश्याला खर्च केला जगाने पुसले

माझ्यावरी वेचलेल्या कष्टांची मी ऋणी आयुष्यभर

तव साथ आशीर्वाद दिलेले संस्कार वळण पुरेल मला आयुष्यभर

तुझ्याचमुळे मी सदा आनंदी,दुसऱ्यास करावी मदत हि शिकवण

उपयोगी सदैव मला डोळ्यात आसवांना नाही थारा आयुष्यभर

पतीसम खेड्यातल्या आयुष्यात मज सर्व गुण दिले

ताकद जगात चालण्याची बाळ कडू पाजले

गुटी उगाळून भक्ती श्रद्धेची पाजुनी मोठे केले

सगळ्या आईहूनी वेगळी तू जगण्यास बळ दिले

भाऊ माझा जरी लहान अर्धांगीसह लक्ष त्याचे मजकडे महान

तव गुणी नातवाचे वागणेच छान हे तुजला समाधान


वाटते खूप काही करावे परी मी न कवी

जे जैसे सुचले तैसेच लिहिले,लोकराग मनी न यावा हि शिकवण

उपयोगी मम मनाला नेहमीच हसरी मी हि देणगी तुझीच

पायात दोष माझ्या मनात नाही रुजला

तुझ्याचमुळे मी ताठ उभी ह्या जगी

 

किती लिहू न काय लिहू सुचेना झाले मला

तव वर्णन कराया शब्द न पुरती मला

काय कमी राहिले समजून घे मला

जगालाही कळू दे जरा नेहमीच कष्टणाऱ्या तुला


Rate this content
Log in

More marathi poem from Jyoti Kale

Similar marathi poem from Inspirational