STORYMIRROR

Jyoti Kale

Others

3  

Jyoti Kale

Others

सदाफुली

सदाफुली

1 min
189

नात्याला नसे नाव, बंध हे रेशमाचे

फुलते रोज हे मळे केशराचे

बारा गावच्या बाराजणी

सायं कट्ट्यावरी जमतो सऱ्याजणी

कोणी होत्या शिक्षिका,कोणी गृहिणी

सगळ्या महिलांची काळजी घेई आजवरी कुणी

बाहेर चाकरी ,घरकाम करुनि सगळ्या जणी

दमल्या आजवरी,परी न येई कंटाळा कुणी गाई गाणी

सुखदुःखात होतो सहभागी, करितो थोडे थोडे समाज ऋणी

असे मनांत धरुनी, कधीतरी करतो खाणीपिणी

संध्यासमयी एक तासाची वाट बघते रोजच प्रत्येकाचे मन

मानसी फुलतो मोर पिसारा अन बागडून येते सकल जन

अशीही आमुची बहरलेल्या नात्याचा

सुरेख गजरा माळलेली सदाफुली


Rate this content
Log in

More marathi poem from Jyoti Kale