आई
आई
उगवती पासून माय राबती घरात
जशी हंबरती गाय वासरासाठी गोठ्यात!
आईला माझ्या सगेसोय ऱ्यांचा ओढा
काम करुनी करिती पाहुणचार हि थोडा !
सगेसोयऱ्यांचा राबता घरात
लेकीबाळी सदा वाट बघती दारात !
आईच्या मोठेपणाची काय सांगावि थोरवी
गडी मानसे शेतात राबती बरवी!
आईला माझ्या दिवसा नाही विसावा
जसा सूर्य पूर्वेकडून दिसावा!
सूर्या संगे तिचा दिवस होतो चालू
माणसे सारी दमली पण काम तिच चालू !
संसाराचा गाडा ओढते माय
तिची सर गड्याला देखील नाय !
लेकरा बाळा मध्ये जीव तिचा रमतो
संसार आणि संसार एकच ध्यास असतो!
आई सारखी माझ्या जगात नाही दुसरी
जशी माय लक्ष्मी थाटली देवाच्या देव्हारी !