माझा गाव
माझा गाव
गावाला माझ्या वरदान दिले निसर्गाने,
सकळ जन रहाती मजेत आणि आनंदाने!
डोंगरा सम दुर्गा टेकडी गावाच्या उत्तरेला,
लहान थोरांचा दिवस चालु होतो तिच्या भेटीला!
पवना नदी वाहते माझ्या गाव कुशीतून,
शेतं हिरवी होती पवनेच्या पाण्यातून!
समुद्रकिनारा तसा दूर नाही गावाला,
पाऊस पडू दे म्हणावं लागत नाही देवाला!
पश्चिमेकडून खारे वारे वाहती पूर्वेकडे,
जणू पावसाला आनन्या मु
ऱ्हाळी गेला ढगाकडे!
पवना नदीचं पात्र तस लई न्यारं,
चहूबाजूने गावच्या सुपीक मातीच खोरं !
बळीराजा दिवस-रात्र राबतो त्याच्या क्षेत्रात,
पाण्याला कधी कमी नाही पवनेच्या पात्रात!
सुजलाम-सुफलाम गाव माझा निसर्गाच्या वरदानाने,
ऐतिहासिक वारसाही लाभला वीर पुरुषांच्या बलिदानाने!
पंचक्रोशी गुणगान गाते धार्मिक आदर्शाने,
पावन झाले गाव माझे मोरयाच्या पदस्पर्शाने!