छत्र्या
छत्र्या

1 min

407
रानात आमच्या झाड एक आंब्याचे,
रूप देखणे साजरे तयाचे!
छत्रीसारखे रूप त्यास लाभले,
म्हणून छत्र्या नाव त्याला ठेवले!
छत्र्याची ख्याती पंचक्रोशीत नामी,
आंबा खाताना आधी गोडीची हमी!
दूर दूर वरून नामी जण येती,
पाहण्या छत्र्याची रूप आणि महती!
उन्हाळ्यामध्ये गायी गुरांचा असे विसावा,
जसा सगळ्यांना जवळ घेऊन पोक्ता बसावा!
देवाची ही आमच्या छत्र्यावर मर्जी,
भंडाऱ्यासाठी केली खुद देवानेही अर्जी!
बालपणीच्या आठवणीत गर्द छत्र्याची सावली,
लोकसेवा करून मर्जी सगळ्यांची पावली!
पिढ्यांमागे पिढ्या अंगाखांद्यावर खेळल्या,
त्याच्या ठायी आता फक्त आठवणीच उरल्या!
त्याच्या परी फळ आणि गोडी नाही चाखायला,
कहाणी त्याची न्यारी, दिस पुरणार नाही वाखायला!