Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swara Deshpande

Children

4.7  

Swara Deshpande

Children

आभासी दुनिया

आभासी दुनिया

1 min
681


मनू गं मनू, काय झालं तुला?

नाकाचा शेंडा एवढा लाल का झाला ?

काय सांगू दादा, करमेनाच मला 

आभासी या दुनियेची सवय नाही मला 


शाळकरी मुले आम्ही, सांग घरी कसे बसू?

मित्रांबरोबर आता काय फक्त चॅटवरती हसू?

शाळा, गॅदरिंग, नृत्य, नाटक केवढा तो पसारा 

सगळं बांधून ठेवायला एक लॅपटॉप पडेल काय पुरा?


सखे सवंगडी, मजा मस्ती, कट्टी बट्टीच्या वाऱ्या 

आता दंगा नाही, धमाल नाही, काढाव्या कोणाच्या खोड्या?

गणपती, दसरा, दिवाळी, उल्हासित सणांच्या या वेळा 

चार भिंतींतुनी निरखाव्या काय फक्त आकाशातल्या जोड्या?


वर्षभर वाट बघायचो, अविस्मरणीय त्या सहलीची 

रात्र असायची भरलेली, गप्पा टप्पा आणि गोष्टींची 

स्वच्छंदी हे अनुभव फक्त आठवण बनून राहतील का?

निसर्गाच्या सान्निध्यात परत माझे दिवस रमतील का?


फिटली सारी हौस माझी टीव्ही, फोन, लॅपटॉपची 

सर नाही मुळीच त्यांना लगोरी, सागरगोट्यांची 

हसण्या खेळण्यात रमलेली इवलुशी आमची दुनिया 

कोरोनाने बदलून टाकली, आयुष्य जगण्याचीच भाषा 


सांग ना रे दादा, हेही दिवस जातील का?

फिरुनी परत माझे बालपण मला देतील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children