आभास की प्रेम...
आभास की प्रेम...
आभास की प्रेम...
तुझं आणि माझं प्रेम
आहे फक्त आभास
ठरल्या वेळी न चूकता रोज
फोन करतेस तू कोणाला तरी !
सकाळी, दुपारी , संध्याकाळी
आणि रात्रीही !
कोणीही असेल तो किंवा ती...
त्यामुळेच रोजच
माझ्या मनात विचार येतो ...
थांबवावं का प्रेमात पडणं तुझ्या..?
मग टाळतो मी तुला
माझ्या मनात नसतानाही ...
त्याचा तू काय अर्थ काढतेस...
की काढतच नाहीस ?
माहीत नाही मला...
मी जागत असतो फोन सोबत
रात्री अपरात्री ... कधीही
पण मी गुंग असतो माझ्या व्यापात...
माझा मोबाईल भरलेला असतो
फोटोनी कोणाच्याही
पण त्यात आठवणी
फक्त तुझ्याच असतात...
तू माझ्या प्रेमात कधीच नव्हतीस
मीच निर्माण केला होता
तुझा माझ्यावरील प्रेमाचा आभास...
तुझ्या आणि माझ्या
आभासी जगातही
खूप अंतर आहे...
न राहून माझ्या मनात विचार येतो
आभासी जगातही
मी तुझ्यावर अन्याय का करावा ?
तुझे माझ्यावर प्रेम नसतानाही
मी त्याचा आभास तरी
का निर्माण करवा ?
तू आभास असलीस
तरी मी भास आहे
तुझ्यासाठी प्रेमाचा...
