रात्र चांदणी 🌺
रात्र चांदणी 🌺
दे मयूर स्पर्श तुझा
धर हातात हात माझा
ना नकार कुठला त्रागा
कर घट्ट रेशीम धागा............
तो धुंद मदमस्त तारा
का लाजवी शीत चंद्रा
गुज करतो खट्याळ वारा
बघ सागर संगम नीरा..........
ही रात चांदणी भुवनी
फुल सुगंधी रात राणी
दव बिंदू टपोर पानी
कर विहंगम रात सजणी.......

