Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Inspirational Others

4.0  

Jyoti gosavi

Inspirational Others

सुंठी वाचून खोकला गेला

सुंठी वाचून खोकला गेला

2 mins
1.0K


खविंद यांचे राज्य सध्या टेक्नो सहावी झाले होते. राज्यातील सर्व मंत्र्यांना लॅपटॉप देण्यात आले होते. बिरबलाला देखील लॅपटॉप दिला होता, पण बिरबल त्याच्यावरती विसंबून न राहता वेश बदलून राज्यांमध्ये फेरफटका मारत असे. 

ज्या गोष्टी लॅपटॉप वरती समजत नाहीत त्या गोष्टी प्रत्यक्षात जनतेमध्ये मिसळल्यावर समजतात हे त्याला माहीत होते. बराच पालकांमध्ये अशी चर्चा होते की आजकाल मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे मुले अभ्यासात लक्ष देत नाहीत .

त्यातूनच पब्जी नावाचा एक असा खेळ आहे. जो मुले दिवस-रात्र खेळतात त्यातून पार हिंसक होतात. अभ्यासात मन लागत नाही. वेड लागण्याची पाळी येते. यावरती बादशहा अकबराकडे बऱ्याच बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. तसेच निनावी अर्ज देखील गेले होते. परंतु दरबारातील एका मंत्र्याची स्वतःची वेबसाईट होती , ज्या वरती पब्जी लोड होता .त्यामुळे सदर मंत्री आपले वजन वापरून तक्रारींचे अर्ज परस्पर निकाली लावत होता. बादशहा अकबराच्या पर्यंत सदर अर्ज जात नव्हते. त्यामुळे सर्व पालकांना काय करावे असे प्रश्न पडला होता. 

जनसंपर्क मंत्रालयामध्ये सदर अर्जाचा ढिग पडला होता. तसेच त्यांच्या इमेल वरती अनेक तक्रारी आलेल्या होत्या. परंतु यातून कोणीही मार्ग काढत नव्हते. अखेर बिरबलाने ठरवले आता आपणच काहीतरी केले पाहिजे. 

 मग बिरबलाला एक युक्ती सुचली सदर मंत्र्यांचा मुलगा पाचगणी च्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये शिकत होता. बिरबलाने अचानक या शाळेला भेट दिली आणि मुलांची प्रगती याविषयी विचारणा केली. सगळी मुले होस्टेलला राहत असल्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल तर होताच. त्याशिवाय त्यांना आपल्या पालकांशी संपर्क साधता येत नसे. शिवाय सगळी मुले उच्चशिक्षित उद्योगपती, डॉक्टर्स, मंत्री यांची मुले तेथे शिक्षण घेत असत. 

त्यांना कशाचीच कमी नव्हती परंतु शाळेची मोबाईलच्या बाबतीमध्ये कडक शिस्त होती. होस्टेल ला मोबाईल जामर बसवला होता .फक्त संध्याकाळी दोन तास पालकांना फोन लावण्याची किंवा मोबाईल बघण्याची मुभा होती. बाकी वेळ त्यांचे मोबाईल होस्टेलच्या रेक्टर कडे असत. 

एक दिवस बिरबलाने त्यांच्या मुलाची चोरून भेट घेतली आणि त्याच्या वाढदिवसाचे निमित्त करून पब्जी लोड करून तो मोबाईल मंत्र्याच्या मुलाला भेट दिला. शिवाय तो खेळ कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच हा खेळ खेळले तर तू कसा शूर होशील ,तुला कसे फायटिंग शिकता येईल, तुला यातून बक्षिसे मिळतील. तू जर याच्या रेंज जिंकलास तर मी तुला माझ्याकडून बक्षीस देईन असे आमिष दाखवले. हळूहळू मंत्र्याच्या मुलाचे अभ्यासावरील लक्ष कमी झाले ,आणि तो परीक्षेत नापास झाला.

 शेवटी शाळेच्या प्रिन्सिपलनी त्याच्या पालकांकडे त्याची तक्रार करून त्याची घरी पाठवणी केली .हे असे का झाले याचा विचार करता सदर मंत्र्यांच्या लक्षात आले आपला मुलगा देखील पब्जी च्या आहारी गेला आहे .तुला कोणी शिकवले? कोणी मोबाईल दिला? याबाबत खूप चौकशा केल्या परंतु काही उत्तर मिळाले नाही .

कारण नंतर बिरबल वेश बदलून भेटत होता. मोबाईल देताना पण बिरबलाने वेश बदलला होता त्यामुळे कोण आहे ते त्याला ओळखता आले नाही .परंतु एक गोष्ट मात्र झाली .मंत्र्यांनी जराही गाजावाजा न करता सदर वेबसाइटवरून पब्जी हा गेम बंद करून टाकला. आणि आपोआप सुंठीवाचून खोकला गेला


+++++++++++++++++


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational