कृष्ण सुदामा मैत्री
कृष्ण सुदामा मैत्री
भगवान श्रीकृष्ण हे संदिपनी ऋषींच्या आश्रमात गुरुकुल मध्ये उज्जैन इथे राहत असतात. त्याकाळी त्यांना गुरुकुल मध्ये सर्व कामे करावे लागतात. जसे झाडू मारणे, सडा घालणे, जन्गलातून लाकूड तोडून आणणे असे कामे करावी लागत. त्यात राजाची मुलं किंवा प्रजेची असा भेदभाव नव्हता. कृष्णासोबत संदिपनीच्या आश्रमात सुदामाही शिकत होता.
एकदा संदिपनीच्या पत्नीनी कृष्णा, सुदामा आणि अन्य मित्रांना जन्गलातून लाकडं तोडून आणायला सांगितली. त्याकाळात स्वयंपाक करण्यासाठी लाकडं इंधन म्हणुन वापरत. जंगलात लाकडं तोडायला जाताना गुरुमाई नी सुदामाला बोलवून थोडे फुटाणे दिले आणि सांगितले सुदामा हे फुटाणे सोबत ने त. तिकडे लाकडं तोंडताना उशीर झाला तर तुम्हाला भूक लागेल तर तेव्हा हे फुटाणे तुम्ही सर्वांमध्ये वाटून खा.सुदामा हो म्हणाला.हे सर्व मित्र लाकूड आणायला गेले लाकूड जमा करून मोडी डोक्यावर घेऊन आश्रमात परत जायला निघाले. तेव्हड्यात आभाळ गरजते आणि धो धो पाऊस पडायला लागतो त्यामुळे श्रीकृष्ण आणि सर्व मित्र पावसापासून वाचण्यासाठी झाडावर चढतात. सर्वांना उशीर झाल्यामुळे कडक्याची भूखही लागते.सुदाम्याला आठवते कि गुरु मावलीनी वाटेत खायला फुटाणे दिले होते आणि ते सर्वांना वाटून खायला सांगितले पण त्याला वाटले आपल्याजवळ फुटाणे हे कुणाला माहिती नाही आणि मला खुपच भूख लागली त्यामुळे तो ते फुटाणे काढतो आणि एकटाच खातो. त्याच्या तोंडाचा खाण्याचा आवाज मुलांना जातो तेव्हा सर्व त्याला विचारतात तु काय खातोस तो म्हणतो काही खात नाही इथे काय खाणार? श्रीकृष्ण त्याला म्हणतो पण तुझ्या तोंडाचा आवाज येत आहे सुदामा म्हणतो अरे माझे दात थन्डीने कडाडत आहे. त्यामुळे वाजत आहेत. श्रीकृष्णाला कळते कि हा खोटा बोलत आहे श्रीकृष्ण त्याला तोंड उघडायला सांगतो. नाही नाही म्हणता तो उघडतो तर ते फुटाणे दिसतात. त्यावर कृष्ण म्हणतो अरे इथे सर्वानाच भूक लागली तु किती स्वार्थी आहेस. तु ते एकटा कसे खाऊ शकतो ते ऐकून सुदामाची मान शरमेने खाली जाते आणि त्याचेच फळ म्हणुन सुदामा मोठा झाल्यावर खुप गरीब होतो.कृष्ण सुवर्णं नगरीं द्वाराकेचा राजा बनतो.
परिस्तितीला कंटाळून सुदाम्याची बायको त्याला म्हणते तुमचा मित्र एव्हडा सुवर्णं नगरीं द्वारकेचा राजा आहे. त्याला भेटून काही आपली सुधारणार का बघा? सुदामाला ते आवडत नाही पण बायकोच्या हट्टामुळे तो तयार होतो. जाताना खाली हात कसे जाणार म्हणुन त्याची बायको एका मळलेल्या कापडात पोहे बांधून देते.सुदामा सुवर्णं नगरीत कृष्णाला भेटायला पोहचतो. त्याचे बैभव बघून सुदामाचे डोळे दिपतात. सुदामा आला कळल्यावर कृष्ण स्वतः त्याच्या स्वागतासाठी जातो. त्याला पंचपकवनाचे जेवण देतो. शेवटी सुदामा निरोप घ्यायला निघतो पण त्याची कृष्णाला मदत मागण्याची हिम्मत होत नाही. तो तसाच जायला निघतो. तेव्हड्यात कृष्ण सुदामाला म्हणतो. अरे सुदामा एव्हडया दूर भेटायला खाली हात आला. माझ्यासाठी काही कसे आणले नाही. सुदामाला पोहे आणलेले आठवतात पण त्याला ते देण्याची लाज वाटते. तो म्हणतो अरे मी काहीच आणले नाही. कृष्ण म्हणतो असे होऊच शकत नाही. वहिनीनी काहीतरी दिले असेल. कृष्ण तत्याच्या हातातून पिशवी घेतो तेव्हा त्याला ती कापड काहीतरी गुंडाळलेला दिसतो. सुदामा म्हणतो हे बघ मी म्हटले ना वहिनीने माझ्यासाठी काहीतरी पाठवलेच असेल. ते उघडून पोहे बघतो आणि कृष्ण खुप खुश होतो. अरे वा पोहे तर मला खुप आवडतात. ते पोहे कृष्ण आवडीने खातो. सुदामा घरी जायला निघतो आणि वाटेत विचार करतो की आता बायको रागवणार आपण कृष्णाला काहीच मदत मागितली नाही. असाच विचार करता करता स्वतः च्या गावाजवळ पोहचतो तर त्या गावाचे पूर्ण रूप पालटले असते. हे बघून सुदामाला वाटते की आपण रस्ता चुकलो का तर तेव्हड्यात त्याची बायको नटून थटून त्याच्या स्वागताला येते आणि हसत म्हणते धन्यवाद तुमच्या मित्राने आपली परिस्तिथी बदलून टाकली.
अशी ही कृष्ण सुदामाची परिस्थिती वेगळी असली तरी अजरामर मैत्री असते.
