Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

तात्याला महागात पडला फराळ

तात्याला महागात पडला फराळ

1 min
259


दिवाळीचे दिवस एकमेकांना फराळ देण्याची प्रथा आहे तसेच एक निनावी गिफ्ट बॉक्स कुरिअरद्वारे तात्या विंचूच्या दारी येऊन धडकते. सुंदर रंगीत पेपरमध्ये तो बॉक्स चांगला गुंडाळला होता. वर शुभ दीपावली लिहिले होते नाव गाव नसलेलं ते गिफ्ट तात्याने घरात आणले.

"आपले तर कोणाशी चांगले संबंध नाही मग हे कोणी पाठवलं असेल जाऊ दे पाहू या तरी त्यात काय आहे."

तात्याने गिफ्ट उघडले बॉक्समध्ये दीपावलीचा फराळ होता. एका बाजूने काजू बदाम आणि अक्रोड तर दुसऱ्या बाजूला चिवडा चकली लाडू शंकरपाळी होती. तात्याचे डोळे चमकले फराळाचा वास येत होता. 

"वाह काय वास येतो."

"लगेच तात्या आत गेला प्लेट घेऊन आला."

तात्या तसा तिखट माणूस त्याने फराळही तसाच उचलला प्लेटमध्ये चिवडा घेतला. 

"वाह काय चिवडा आहे मजा आली."

तात्याने चकली उचलली तोंडात टाकली पण चकली काही तुटेना. 

"अरे एव्हडी घट्ट आहे ही."

तात्याने जोर लावला चकली तुटली नाही पण तात्याचे दात मात्र तुटले. 

"अरेरे हे काय झाले माझे दात... ही चकली पीठाची आहे की दगडाची?

तात्याचे तोंड दुखू लागले. माझे दात असे म्हणुन तात्या रडू लागला. 

"मी दुसऱ्यांना रडवतो आणि मला कोणी रडवले हे कोणी पाठवलं ते एकदा कळू दे मी त्याचे ओम भट स्वाहाच करून टाकणार."

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. विव्हळत तात्याने दरवाजा उघडला. बाहेर कोणी नव्हते. एक चिठी मात्र पडलेली होती. तात्याने चिठी उघडली. 


'काय तात्या कसा वाटला फराळ... मस्त लागला ना... मस्त लागलाच असेल.' 


तुझा शुभचिंतक 

इन्स्पेक्टर महेश 

"हा काही माझी पाठ सोडत नाही वाटत माझे दात "

तात्या दुखण्याने  विव्हळवू लागला 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy