शांत बुद्ध ही आज !
शांत बुद्ध ही आज !
शांत बुद्ध ही आज
आर्त अशांत भासतो
सिद्धांत त्याला त्याचाच
काहूर उना गवसतो
अबोल, अचल,
हसरी मोहक कांती
कुणास ठाऊक मनी
अगणित युद्ध दाटती
बुद्ध माझा निराळा
त्याच रिंगण अफाट
नको त्या अनोळखी व्यापात
गुंतुन राहिला फुकाट
उरतो आता तोच तो
स्वतःसाठीच फक्त
हरवते जग त्याला
तो जिंकून होतो व्यक्त