अजिंक्य
अजिंक्य
1 min
277
सूर्य काचरतच होता
उगवायला आज
ढगांच्या मनावर म्हणे
कळकटलेली साज
मळभाच सावट
चुकलं त्यालाही नाही
सारी सृष्टी दिपवनारा
नम दिस काही
तरीही दिव्य प्रकाश
काही दडत नव्हता
यत्न जिंकण्याचाही
आटोकाट होता
मळभाचाही काळ
सरून गेला
उफळण्याचा यत्न
तडीस आला
काळ्या ढगांमागून
नवी आशा चमकली
लख्ख पांढरी शुभ्र
किरणं डोकावली
आता मात्र निर्दयी
ढगाला नाही सोसावल
ऊन सावलीलाही
त्यानं चांगलंच खेळवल
जीव सारा एकवटला
आता आग डोळ्यावरती
किरणं तलवारी सारखी
धारदार भासती
दोन हात मळभाशी
ढग कापूर झाला
कळकटलेलं सावट कापत
लख्ख प्रकाशीत झाला
तो सूर्य, तो अजिंक्य
शांत झालं तेज मावळतीला गेला
कधीही न हरण्याचं शिकवूनच गेला
