निरोप
निरोप
काय द्यावा निरोप आज
किती आठवाव्या आठवणी,
माहेरच्या या अंगणी आज
गेलं बालपण हरवूनी,
पाऊलं आज पडत आहेत
सासरच्या त्या वाटेवरी,
नाही आवरू शकले आसवांना
डोळ्यांत भरूनी आल्या सरी,
मूक भावना झाल्या साऱ्या
शब्दही राहिले सारे उरी,
डोळे काही सांगावया
फिरुनी पाहतात माघारी,
माहेरच्या या वाटा मला
उद्या होतील परक्यापरी,
मागे आठवणी राहतील
जवळी नसले तुमच्याजरी,
हाच आहे निरोप माझा
जपून ठेवा आठवणी,
आली कधी आठवण माझी
आणू नका डोळ्यांत पाणी……….
