STORYMIRROR

गणेश कुलकर्णी

Abstract Romance

4  

गणेश कुलकर्णी

Abstract Romance

तू आणि पाऊस!!

तू आणि पाऊस!!

1 min
290

तू आणि पाऊस!!

तुझी याद आली म्हणून...

काल पाऊस पडून गेला!

मजजवळ काल पाऊस रडून गेला!

आता तू म्हणे भिजत नाहीस

हल्ली पहिल्या सारखी चिंब चिंब

काल पाऊस मला बोलून गेला! 


तो बरसत, कोसळत असताना...

म्हणे तू आता तुझ्या घराच्या खिडक्या, दारं 

बंद करून घेतेस...,

अगदी लगबगीनं!

तेव्हा...,

तुला किती आल्हाददायक 

वाटायचं वातावरण...

ढग दाटून आले की...!

आता म्हणे...

तुला बरं वाटते ढग कोरडे असले की!


तेव्हा...,

तुला विजाच्यां कडकडण्याचे

आश्चर्य वाटायचं...,

आता म्हणे तुझ्या घरात वातावरण

होतं घाबरायचे!

तो कधी कधी रिमझिमताना...,

तू चक्क भिजत यायचीस घरी!

आता त्याच्यात आणि तुझ्यात म्हणे...

निर्माण झाली आहे दरी!


मला वाटतं...

बहुधा पावसाला अजुनही 

माहीती नसावे ...

की तू आता आई 

झाली आहेस ते!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract