STORYMIRROR

गणेश कुलकर्णी

Others

4  

गणेश कुलकर्णी

Others

आता कुठे पाहिजे खरी भक्ती तुला

आता कुठे पाहिजे खरी भक्ती तुला

1 min
28.4K


आता कुठे पाहिजे खरी भक्ती तुला?

आता कुठे पाहिजे खरी भक्ती तुला?...

तू होतोस श्रीमंत जेवढा भरतो तुझा गल्ला! || १ ||


त्यांनी मंदिर पाडले, यांनी मज्जीद पाडली...

तुझ्या एक नसण्याने होतोय बघ हल्ला! || २ ||


तुझ्या दर्शनाला यावे म्हणतो देवा एकदा...

पण माझ्याजवळ नाही रे VIP चा बिल्ला ! || ३ ||


तू बसतोस हल्ली शांतपणे मंदिर-मज्जीद मध्ये

तू बोललास साधं तरी इथे होतो त्याचा कल्ला! || ४ ||


मी कशाला करू तुझे नामाकरण वादासाठी...

इच्छा एकच एकत्र यावे ईश्वर आणि अल्ला! || ५ ||


अगदी जवळच आहे काशी आणि मक्का...,

माणसांनी गाठावा मनामनातला पल्ला! || ६ ||


Rate this content
Log in