STORYMIRROR

Gauri Kulkarni

Drama Romance Tragedy

3  

Gauri Kulkarni

Drama Romance Tragedy

यु टर्न - भाग५

यु टर्न - भाग५

3 mins
253


सकाळी उठल्यापासून नेहाची चाललेली गडबड पाहून तिच्या नवऱ्याने राघवने न राहवून तिला विचारलच कि काय शिजतंय तिच्या डोक्यात? आपल्या प्लानचा त्याला थोडक्यात अंदाज देत ती आवरत होती. गरज पडलीच तर तुला फोन करेन असं त्याला हक्काने सांगून ती निघाली. आज वातावरण किती छान आहे असं स्वतःशीच म्हणत तिने गाडी चालू केली आणि ती थेट ऑफिसला आली. तिकडे सारंग स्वतःसुद्धा सानिकाला कसं मनवायच याचा विचार करत होता. त्यासाठी त्याने नेहाचीच मदत घ्यायची असं ठरवलं. सारंगचा सकाळी सकाळी आलेला मेसेज पाहून नेहाला आश्चर्य वाटलं. त्याने तिला भेटायला बोलावलं होतं.


संध्याकाळी सारंग तिला भेटला आणि त्याने तिला सानिकाबाबत सांगून एक सुखद धक्काच दिला. जी गोष्ट कशी करायची याचा विचार नेहा दिवसभर करत होती तिचं करण्यासाठी सारंग स्वतः तिची मदत मागत होता. सारंगच्या म्हणण्यानुसार नेहाला फक्त सानिकाला कॅफे यु टर्न मध्ये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणायचं होतं. त्यासाठी नेहाने लगेच सानिकाला फोन केला आणि तिने केलेल्या सगळ्या मदतीसाठी तिला एकदा भेटून बोलायचं आहे असं सांगीतल. सानिकाने सुरुवातीला नको म्हणत टाळायचा प्रयत्न केला पण नेहाचा आग्रह ती मोडू शकली नाही आणि संध्याकाळी कॅफेमध्ये येण्यास तयार झाली. सारंग मनापासून नेहाला थॅँक्स म्हणत ते दोघे निघाले. 


इकडे सानिका क्लीनिकमधून गाडीवर घरी निघाली होती “अभी न जाओ छोडकर कि दिल अभी भरा नही” असे शब्द कानावर पडताच सानिका थबकली. तिला तिची आणि सारंगची ती भेट आठवली जेंव्हा त्याने तिला हे गाणे चालू असताना खूप रोमॅन्टिक पद्धतीने प्रपोज केले होते. ते क्षण आठवताच नकळत तिचा चेहरा उजळला. आणि हे अचानक आपल्याला काय होतंय याचा विचार करत ती घरात निघाली. पण नेहमीप्रमाणे समोरून कोण आलाय याकडे लक्ष नसल्याने ती अमेयला जाऊन धडकली. तिचा ब्लश करणारा चेहरा पाहून त्याने तिला चिडवायला सुरुवात केली. कशीबशी त्याच्या तावडीतून तिने स्वतःला सोडवले. पण आज सारंग आणि त्याच्या आठवणी मात्र तिचा पिच्छा सोडत नव्हत्या. त्या आठवणींच्या ताब्यातून स्वतःला सोडवत असतानाच तिला झोप लागली. आकाशातला चंद्रहि उद्या भेटण

ाऱ्या पौर्णिमेच्या आठवणीत अडकला होता. तशीच काहीशी अवस्था सारंगची सुद्धा होती.


दुसऱ्या दिवशी सानिका खूप काम असल्याने बिझी इतकी होती कि तिला संध्याकाळ बद्दल नेहाने आठवण करून दिली. तर तिकडे सारंगला मात्र खूप काम असूनही संध्याकाळ शिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. संध्याकाळी ठीक ७ वाजता सानिका कॅफे यु टर्न च्या पार्किंग मध्ये आली आज कॅफेचं वातावरण तिला काहीसं ओळखीचं वाटत होतं शिवाय विकेंड असूनही तिथे फारशी गर्दी नव्हती. हे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं. तिने नेहाला ती कुठे आहे हे विचारण्यासाठी फोन केला तर तिला अजून १५ मिनिटे लागतील असं कळाल. तोपर्यंत काय हा विचार करत ती उभी असताना कॅफेच्या मॅनेजरने तिला नेहमीच्या टेबलवर बसायला सांगितलं. ती तिथे बसली आणि काही सेकंदातच कॅफेमधले लाईट गेले. आणि कुणी काही बोलायच्या आत समोर असणाऱ्या मोठ्या स्क्रिनवर एका खूप सुंदर कपलचे फोटो दिसू लागले ते सगळं बघून सानिका थक्क झाली. कारण ते फोटो तिचे आणि सारंगचे होते. त्यांच्या सुंदरश्या आठवणी आणि प्रत्येक आठवणीसोबत एक मेसेज. सानिकाची माफी मागणारा झालं गेलं ते विसरून जायचं प्रयत्न कर असं म्हणणारा. सानिकाची भिरभिरती नजर आता फक्त त्या व्यक्तीला शोधत होती. क्षणार्धात सगळा कॅफे उजळला आणि सरप्राईज असं म्हणत तिच्या, सारंगच्या घरचे , त्यांचे सगळे फ्रेंड्स यांचा गराडा सानिकाभोवती पडला. सगळ्यांशी बोलत असतानाच तिला बॅकग्राऊंडला तेच गाणं ऐकू आलं 


“अधुरी आस छोडके, 

  अधुरी प्यास छोडके 

  जो रोज युंही जाओगी

  तो किस तरह निभाओगी,

   के जिंदगी कि राह में 

   जवा दिलोंकी चाह में ,

   कई मकाम आयेंगे 

   जो हमको आजमायेंगे...........” 


पुढचं सगळं गाणं तिच्यासमोर सारंगला बघताच तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणीच म्हणत होतं. तो हळूच तिच्यासमोर आला आणि दोघांनी सॉरी म्हणण्यासाठी एकत्रच एकमेकांचे कान धरले. तसा अख्खा हॉल हास्यात बुडाला...

(समाप्त) 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama