Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Gauri Kulkarni

Drama Romance Tragedy

3  

Gauri Kulkarni

Drama Romance Tragedy

यु टर्न - भाग२

यु टर्न - भाग२

3 mins
181


“आज तरी लवकर यायचंस न रे?” सानिका गाडी पार्क करत असलेल्या सारंगला थोडी रागातच म्हणाली, तसं तिच्याकडे टक लावून बघत तो हसला आणि गाडीतून उतरताना मागे लपवलेले गिफ्ट त्याने तिच्यासमोर धरत तिचा कान पकडला सॉरी म्हणण्यासाठी. एकमेकांना सॉरी म्हणण्यासाठी ते नेहमी असंच करायचे ज्यामुळे समोरचा कितीही रागात असला तरी ते विसरून मनापासून हसायचा. आत्ताही तसचं घडलं सारंगच्या त्या कृतीने सानिका खुदकन हसली. आणि मग दोघेही हातात हात घेऊन नेहमीच्या टेबलवर येऊन बसले. 


आजच्याच दिवशी १ वर्षांपूर्वी ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. सारंग च्या बहिणीच्या स्वरूपाच्या लग्नात. सानिका स्वरूपाचा नवरा अमेयची मावस आणि एकुलती एक लाडकी बहिण असल्यामुळे करवली म्हणून मिरवण्यात ती कुठेही कमी पडत नव्हती. ह्याच लग्नात थट्टामस्करी करता करता ती आणि सारंग एकमेकांचे चांगले मित्र झाले इतके चांगले कि बघणाऱ्याला वाटावं ते दोघ लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. 


सारंग देशमुख IIT मधून पास होऊन आता एका MNC मध्ये काम करत होता. तर सानिका पाटील नुकतीच कुठे देसाई मंडमची असिस्टंट म्हणून जॉइन झाली होती. दोघंही आपल्या कामामधून वेळ काढून आवर्जून एकमेकांना वेळ देऊ लागले होते. हळूहळू इतरासारखच त्यांच्याही लक्षात येत होत कि आपण एकमेकांना मित्रापेक्षाही जास्त काहीतरी मानतोय. 


आणि अशाच एका मस्त संध्याकाळी लॉंग ड्राइवला गेल्यावर सारंगने तिला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत लग्नाची मागणी घातली. आज त्या सेलिब्रेशन साठीच ते दोघ भेटले होते. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार होता आणि मग २ महिन्यात लग्न. इतक्या घाईचं कारण होतं सारंगला मिळालेली ऑफर ५ महिन्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हायचं होत ३ वर्षांसाठी आणि सोबत अर्थातच सानिकाला घेऊन जायचं असल्याने त्या दोघांनी हा निर्णय घेतला होता. घरचे तर आधीपासूनंच त्यांच्या होकाराची वाट पाहत थांबले होते. त्यांच्या या निर्णयाने दोन्हीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले. कॅफे यु टर्न च्या त्या धुंद वातावरणात ते दोघे जगाला विसरून एकमेकातच गुंतले होते. 


इकडे नेहाला मात्र अजूनही सारंगने दिलेला नकार पचवता आला नव्हता. तिने मैत्रीच्या नात्याखातर त्याचे आणि सानिकाचे नाते मान्य केले होते पण ती अजूनही शांत झाली नव्हती. त्या नात्यातूनच बाहेर पडण्यासाठी तिने सानिकालाच मदत कर अशी गळ घातली. 


सानिकाच्या मनात काहीच नसल्याने ती नेहाला वेळ देऊ लागली पण नेहाने मात्र त्याचा फायदा घेत ते सारंगच्या कानावर घातले हे सांगत कि सानिका मला पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी असं करतीय. सुरवातीला सारंगला ते पटले नाही पण मग नेहा त्या दोघींचे बोलणे सानिकाच्या नकळत रेकोर्ड करून आणि त्यात बदल करून सारंग ऐकवले. त्या मध्ये सरळ सरळ सानिका नेहाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतेय अशी काही वाक्ये होती. जे ऐकल्यावर सारंगने सानिकाला जाब विचारला सानिका तो माझा आवाज नाही असं म्हणू शकत नव्हती कारण जुन्या एका नाटकाचे स्क्रिप्ट आहे असं सांगून नेहाने ते म्हणून घेतले होते. 

सारंग काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सानिकाला खडसावत नेहाची बाजू घेतली. आगीत तेल ओतत नेहाने तू अशा मुलीशी लग्न करशील का असं विचारलं तेंव्हा त्याने रागाच्या भरात नाही असं म्हणत सानिकाकडे पाठ फिरवली. विनवणी करत सानिका त्याला परत एकदा विचार कर हेच सांगत होती. पण तो मात्र तसाच उभा होता. 


नेहाने डोळे पुसत जाणाऱ्या सानिकाला थांबवले. आणि इतकेच बोलली कि सारंग कधीच तुझा होणार नाही. त्या वाक्यातून सानिका जे समजायचं होत ते समजली. नेहाच्या त्या प्रकरणानंतर सारंग आणि सानिकाने एकमेकांना भेटणे बोलणे पूर्णपणे टाळले मुलांच्या वागण्याचा अर्थ कळूनही दोन्हीकडच्या घरच्यांनी समजुतीचे धोरण स्वीकारले होते. 


नेहाने त्यानंतर सारंगला आपल्या जाळ्यात ओढण्याचा खूप प्रयत्न केला पण सारंगने तिला नकार देत सरळ ऑस्ट्रेलिया गाठले. नेहाने हे सगळ फक्त तिचा इगो दुखवला म्हणून केल होत त्यामुळे तिला आता सारंग किंवा सानिकात काही इंटरेस्ट नव्हता. त्यांना वेगळ करून तिने मी जिंकले अशी स्वताची समजूत करून घेतली. आणि ती मुंबईला शिफ्ट झाली.


सारंग गेल्यानंतर दोनच दिवसांनी नेहा सानिकाला भेटायला आली होती आणि तिने स्वतःच्या तोंडाने आपण हे सगळं केल होत असं कबूल करत सारंगला कसा धडा शिकवला हे सांगितलं. सानिकाने सारंग आणि त्याच्या घरच्यांशी कायमचा संपर्क तोडला आणि स्वतःला क्लिनिकच्या कामात बुडवून घेतलं.


आज त्या गोष्टीला ४ वर्ष झाली होती सानिका किंवा सारंग दोघांनीही एकमेकांशी कसलाच संपर्क ठेवला नव्हता. पण आज अचानक नेहाची फाईल समोर आल्यावर सानिकाला सगळं आठवलं होतं. उद्या नेहा तिच्या फर्स्ट सेशनसाठी अनिताकडे येणार होती. आपल्याला समोर पाहिल्यावर ती काय करेल याची कल्पना असल्याने सानिकाने सुटी काढली होती.

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Gauri Kulkarni

Similar marathi story from Drama