Gauri Kulkarni

Drama Romance Tragedy

3  

Gauri Kulkarni

Drama Romance Tragedy

यु टर्न - भाग१

यु टर्न - भाग१

2 mins
280


समोर ठेवलेल्या पेशंटच्या फाईल कडे बघत सानिका भूतकाळात गेली. ४ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग झरकन तिच्या डोळ्या समोरून गेला . सारंगला एकदा तरी निर्णयावर पुन्हा विचार कर अशी विनवणी करणारी ती आणि तिच्याकडे पाठ करून उभा असलेला तो. एका व्यक्तीने क्षुल्लक कारणाचा राग मनात ठेऊन त्यांच्या सुंदर अशा नात्याला एक वाईट वळण लावले . खरतर त्या व्यक्ती इतकंच ते दोघेही त्याला जबाबदार होते. पण ती वेळ अशी होती कि कुणीच शांतपणे विचार करायला तयार नव्हते . एका क्षणात जोडल्या जाणाऱ्या नात्याची आणि स्वप्नांची राखरांगोळी होऊन गेली. आज पुन्हा हे सगळं आठवल्यावर सानिका क्षणभर थबकली ह्या विचाराने कि हे सगळं थांबवता येत होत न ? सारंग आणि आपण काहीच का प्रयत्न केला नाही ? विचारांचा गुंता वाढू लागला आणि तश्यातच इंटरकॉम ची बेल वाजली. भानावर येत सानिकाने फोन उचलला. पलीकडून देसाई मॅडम तिला एका जुन्या केसच्या डिटेल्स विचारात होत्या. डिटेल्स देऊन तिने फोन कट केला आणि समोर पडलेली फाईल उघडली.


मिसेस नेहा, एका प्रथितयश कंपनी मध्ये वेब डिझायनर, प्रंचड तणावाखाली येऊन डिप्रेशनची शिकार आणि त्या भरात दोन वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न. याच कारणासाठी तिला तिच्या फॅमिली डॉक्टरनी शहरातल्या सर्वात नामवंत मानसोपचार तज्ञ देसाई च्या क्लिनिकला पाठवलं होतं. आणि आता तिची फाईल सानिका समोर होती,जी त्या क्लिनिक मधली सर्वात हुशार समुपदेशक आणि सायकोथेरपीस्ट होती.सानिका त्या नावामुळे क्षणभर जरी गोंधळली असली तरी स्वतःला सावरून तिने नेहमीप्रमाणे सर्व डिटेल्स वाचून नोटस काढायला सुरुवात केली. त्याचवेळी दारातून “ मे आय कम इन ?” असा आवाज आला. सानिकाने हातानेच बसण्याची खुण केली आणि तयार केलेल्या डिटेल नोट्स अनिता समोर ठेवल्या . त्या हातात घेत अनिता म्हणाली, साना जे झाल त्याला आता ४ वर्ष उलटून गेली आहेत. आणि असाही तुझा तिच्याशी किंवा तिच्या घरच्यांशी आता कसलाच संबंध उरला नाही. मग हि इतकी महत्वाची केस असताना तू का नाही म्हणतेस? आपल्या दोघीनाही हे चांगलच माहित आहे कि सध्या तिला यातून कुणी बाहेर काढू शकेल तर ती तू आहेस मग तू का माघार घेतीयेस? “ I know अनु पण मला कसलीच रिस्क नकोय माझ्या एका शब्दाने तिचं आणि माझही न भरून येणार नुकसान होईल अशी भीती वाटतेय मला. कारण एक माणूस म्हणून मी तिला ओळखते. रागाच्या भरात ती काय पाउल उचलू शकते याची जितकी कल्पना मला आहे तितकी ती इतर कुणाला नसेल.म्हणूनच मी तुला हि केस देतेय जेणेकरून मला तिच्या प्रगतीबद्दल वारंवार कळत राहील आणि योग्य वेळी गरज पडल्यास तुला मदतही करता येईल.” जशी तुझी इच्छा असं म्हणत अनिता फाईल घेऊन निघून गेली आणि सानिका पुन्हा एकदा भूतकाळात हरवली.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama