विश्व लेखणीचे...स्टोरी मिरर
विश्व लेखणीचे...स्टोरी मिरर
विश्व लेखणीचे नभांगणातील तारकांप्रमाणे विशाल* .......असंख्य साहीत्य रूपी आकाशगंगा साहित्य क्षेत्राच्या ब्रम्हांडात विहरत आहेत. जपलेले, अनुभवलेले कल्पनेच्या पार भारावलेले, असंख्य भाव-भावनांनी, भक्तीने अवतरीत ओतप्रोत शब्द साहित्य क्षेत्राला व्यापूनही उरतात. मन,भावना आणि विचार यांचे सौख्य अवघ्या विश्वाला भुरळ घालते. वेदना, यातना,ठसठसणारी असंख्य दुःखे साहित्याच्या श्रावणसरीत न्हाऊन निघतात. लेखनीचे विश्व हे अमर्याद, अनंत आहे. या विश्वाचे *स्टोरी मिरर परीवारातील* आपण एक सूक्ष्मरूप आहोत याचा आपल्याला अभिमान आहे.
असंख्य भावनांची गुंतागुंत उलगडतांना मन अक्षरशः गहीवरून येते. लिहीलेल्या कवितेची चमक आणि स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळपद प्राप्त करून देणार हक्काचं व्यासपीठ म्हणजे *स्टोरी मिरर* सदोदीत जगाला प्रकाशमान करत आपल्या अस्तित्वाची सोनेरी किरणे पसरवणाऱ्या रवी प्रमाणे स्टोरी मिररवरील असंख्य कथा, कविता, चारोळ्या प्रत्येकाला त्या किरणात न्हाऊन काढतात. *साहित्य जगतातील नवोदित लेखकांच्या अस्तित्वाचे ठसे जपणारे एक मायेचे स्थान म्हणजे स्टोरी मिरर*
