STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

2  

Deepali Mathane

Tragedy

चारोळी लेखन - देशद्रोही

चारोळी लेखन - देशद्रोही

2 mins
158

1

राष्ट्रभक्त जो विचार न करे

स्वप्नातही देशद्रोहाचा

उधडूनी टाके कट तो सारे

नायनाट करी विद्रोहाचा


2

देशद्रोही समाजद्रष्टे

होते आपल्या देशात

म्हणून इंग्रज नांदले

आपल्या भारतात


3

अनेक संकटे

ओढवली देशद्रोहींनी

देशास गुलाम केले 

या विद्रोहींनी


4


संकटात सापडली

आमुची भारतमाता

देशद्रोहींना याचे मोल चुकवावे लागेल आता


5

देशद्रोह हा 

काय असतो

देशाविषयी अभिमान 

जेथे नसतो


6

गद्दारिची परिसीमा

राष्ट्रभक्तीला छळते

देशद्रोहींना याचे

 मोल कधी न कळते

7

देशद्रोहींमुळेच अडकला 

संभाजी अटकेत

स्वराज्याची शान

जपली हर घटकेत


8

भ्रष्टाचाराचा महिषासुर

देशद्रोहींमुळेच फोफावतोय

आणि जिकडेतिकडे

अनागोंदी कारभार माजतोय


9


भ्रष्टाचाराचे जाळे

देशद्रोहींनी विणले

त्यात अडकून मग

देशवासी शिणले


10

संकट ओढवती 

देशद्रोही देशावर

शिक्षा द्यावी यांना

टांगून वेशीवर


11

देशद्रोही तो पण

जो व्रुक्ष तोड करी

संपवून जंगल

मोकळ रान करी


12

देशद्रोहींच्या शिक्षेत

नसावी तडजोड

माजवती हाहाकार

करून तोडफोड


13

दंगे करून देशात

माजवती अशांतता

देशद्रोहींना न लाभो

कधी निवांतता


14

दंग्यात जातात

अनेक निष्पाप बळी

देशद्रोही करतात 

त्यांच्या संसाराची होळी


15

दंग्यात होरपळतात 

नाहक निष्पाप जीव

देशद्रोहींना येत नसेल

का यांची कीव


16

भ्रष्टाचारी लाच घेती

देशद्रोहास खतपाणी

अशी अवस्था होता

कोठे जावे गरीबांनी


17

गरीब बांधवांना

तीळ-तीळ खात आहे

देशद्रोहाचा आलेख

आणखी उंचावत आहे

18

अधोगतीला नेती

माझ्या देशास

या देशद्रोहींना 

फटके लावा खास

19

देशद्रोहींना शिक्षा

व्हायला हवी कठोर

त्याशिवाय सुधारणार

नाहीत हे हरामखोर

20

पून्हा न कुणी 

हिम्मत अशी करावी

देशद्रोहींना या

शिक्षा अशी असावी

21

आपला देश

आपली माणसं

देशद्रोहींना याचं 

काय फारसं

22

का पसरवती 

देशद्रोही अशांतता

सज्जनास मग

लाभे ना निवांतता

23

देशातली खुशहाली

देशद्रोहींना बघवेना

देशवासियांना मग

हाल सोसवेना

24

देशद्रोहींना या 

कुठली शिक्षा करावी

जेणेकरून पापकर्माला

यांच्या वाटच न उरावी

25

देशद्रोही जगात

वाढतच आहेत

पापवाटेवरचे हे

पापिष्ट आहेत

26

देशा विषयी देशद्रोहींना

का अभिमान नसे

देशहित चिंतणाऱ्यांना

याचा फटका बसे

27

अनेक देशद्रोही हे

भ्रष्ट विचारसरणीचे

कसे पांग फेडतील 

ते यख धरणीचे

28

देशद्रोही जगतात

स्वतः पुरते मतलबी

एक तरी यांचे

कारण आहे का जुजबी

29

देशद्रोहींना पाहिजे

लटकावले फासावर

यांचा उपद्रव नको 

आपल्या देशावर

30

गरीबांचे लुबाडतात

देशद्रोही पैसे

असे आपल्या देशी

हे विराजतातच कैसे

31

देशाचे रक्षक

देशास जपती प्राणपणाने

हे देशद्रोही नतद्रष्टे

दंगे करिती आकांताने

32

शेतकऱ्यांना लुबाडतात

भ्रष्टाचारी नेते

देशद्रोही म्हणून यांना

हिच पदवी उरते

33

अखंडता देशाची

खंडित करिती 

देशद्रोहींना मग

कोण शिक्षा करीती

34

शांतता यांना बघवत

नाही देशाची

देशद्रोही च ते 

यांना तमा कशाची

35

नेऊन सोडा देशद्रोहींना

निर्जन स्थळी

पाण्यासाठी तरसो

दुष्ट हे पळी पळी

36

जनतेवर करिती

देशद्रोही अत्याचार

यांना पापकर्माचे फळ

मिळो भारभूत साचार

37

देशद्रोहींना जर झाली

फाशीच्या शिक्षा 

तर जनतेची

कमी होईल सत्वपरिक्षा

38

देश आमचा 

सर्व धर्मी

याचाच फायदा

घेती देशद्रोही

39

बलात्कारी देखील 

देशद्रोही आहेत

स्त्री विषयीचा आदरास

सुरुंग लावत आहेत

40

मुलींच्या चेहऱ्यावर 

acidहल्ला करीती

देशद्रोहींच्या कर्माची

ती पोर शिक्षा भोगिती

41

Acidहल्ल्यातील तरुणींनी

देशद्रोहींना या शिक्षा द्यावी

का स्वतः बिचाऱ्या म्हणून

अग्निपरीक्षा द्यावी

42

Acidहल्ल्याने 

विव्हळती तरुणी

देशद्रोही संतोषती

हे क्रुत्य करूनी

43

असले नराधम

देशद्रोही कारनामे करतात

निरागस लेकींना

जीव नकोसा करतात

44

देशद्रोहाचा खटला

भरला होता लोकमान्यांवर

स्वातंत्र्यचळवळीत हाच 

परिणाम झाला सामान्यांवर

45

देशासाठी लढले

अनेक स्वातंत्र्य वीर

देशद्रोहींना उभे करून

भर चौकामध्ये चीर

46

यशोगाथा लिहिली

जाते स्वातंत्र्य चळवळीची

पण देशद्रोहींना शिक्षा व्हावी

हि एकच विनंती कळकळीची

47

बलात्काऱ्यांचे गुन्हे

लपतात पुराव्याअभावी

अशा देशद्रोहींना पुराव्याची

गरज च का भासावी

48

देशद्रोहींच्या दयायाचिका

जातात अनेक न्यायालयात

लढतात गरीब न्यायासाठी

विनवणी करत देवालयात

49

ते पण देशद्रोही च

नराधमांना पाठीशी घालतात

काही पैशांसाठी

गरिबांचे हाल करतात

50

अधोगतीला नेतात देशद्रोही देशाला

चीर द्यावी एकदातरी

त्यांच्या बाहूपाशाला

51

जातीभेद देशात

देशद्रोही च भडकवती

गुण्यागोविंदाने नांदणाऱ्यांना

अधोगतीला नेती

52

जीव असतात हे

विक्षिप्त विचारसरणीचे

देशद्रोही च जबाबदार

आपापल्या करणीचे

53

भ्रष्ट नराधम 

बाजार मांडती पैशाचा

देशद्रोही हे अमानुष

फडशा पाडती देशाचा

54

अस्वस्थ होते मन

जेव्हा देशद्रोही दिसतो

आपणच द्यावीशी वाटे शिक्षा

इतका जीव चिडतो

55

या नराधमी देशद्रोहींना

देश निकाला द्यावा

सुंदर माझ्या देशाला

मोकळा श्वास लाभावा

56

हराममोतीने मरतात

हे देशद्रोही असेच

जीवन घालवतात

वाईट क्रुत्यात तसेच

57

देशद्रोहींमुळे जगाला

शांतता नाही लाभणार

भारतमातेस आमच्या

हे असेच छळणार

58

भ्रष्टाचार निर्मुलन

कधी होणार

देव जाणे हे देशद्रोही

कधी जग सोडणार

59

झाशीची राणी हरली

देशद्रोहींमुळे झाशी

रक्त सळसळते त्यांना 

द्यावी वाटते फाशी

60

देशद्रोही हे कीड आहे

एक समाजास लागलेली

कधी बसेल घडी देशाची

विस्कटलेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy