STORYMIRROR

Deepali Mathane

Others

2  

Deepali Mathane

Others

रंग माझा वेगळा (स्फुट लेखन)

रंग माझा वेगळा (स्फुट लेखन)

1 min
189

रंग माझ्या स्वप्नांचा, रंग माझ्या आकांक्षांचा.........!!

सजलाय जीवनात माझ्या रंग माझा वेगळा.......!!

रंग प्रेमाचा, रंग मायेचा,रंग वात्सल्याचा..........!!

रंग किर्तीचा, रंग यशाचा,रंग लोभस हिम्मतीचा मी ही जपलाय जीवनी रंग अपुल्या मांगल्याचा.............!!

स्त्री शक्ती हे रूप मनोहर, विविध रंगातूनही फुलले..........!!

नैराश्याच्या काळीमेतून, संकटातून सावरण्या सकारात्मक विचारसरणीने, जिद्दीने आशेच्या इंद्रधनूचे रंग जीवनात माझ्या विखुरले........!!

मोहक छटा जीवनाची मनं भरून जगावी..............!!

वादळांना भिडण्याची थोडीही तमा नसावी............!!

यश-अपयशाच्या चाकोरीत बांधून कधी राहू नये........!!

येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा महोत्सव झाला पाहिजे...........!!

आपल्या जीवनातील सुख-दुःखाच्या रंगाशी एकरूप होऊन एक वेगळा रंग सजवूनी रंग माझा वेगळा जगता आला पाहिजे...........!!

प्रत्येक भूमिकेतील रंग सामावून घ्यावे आपण तरीही आपला वेगळा रंग , वेगळे पण प्रत्येक रंगात जपावे आपण......!! 


Rate this content
Log in