Deepali Mathane

Tragedy

3.7  

Deepali Mathane

Tragedy

स्फुटलेखन - जीवन

स्फुटलेखन - जीवन

1 min
52


*तुझसे नाराज़ नहीं जिंदगी....... हैरान हूँ मैं......हैरान हूँ मैं.........* 

काय सुंदर गाणं आहेना....!!

मन उदास असल की, आपसूकच ह्या ओळी ओठांवर येतात....

मन भरून येतं आणि आसवांची वाट मोकळी होते....

सुख-दुःखाचे जीवन गाणे गात आपण आपलं जीवन सजवत असतो.... प्रेम असो, वात्सल्य असो तुमच्या कर्तव्यातुन पाझरलं पाहिजे....

असं म्हणतात की आपल्या , सुख-दुःखाची चावी आपल्या हातात असावी...

इतरांमुळे आपण दुःखी होऊ नये...

पण इतकं सोपं असतं का ?........

जे लोक आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत त्यांच्या वागण्या-बोलण्याचा आपल्या जीवनावर, मनावर सखोल परिणाम होतोच न हो.....

हे नाकारून कस चालेल.

त्यात आपण एक करू शकतो.... हास्याचा मुखवटा चढवून प्रसन्न मुद्रा घेऊन चालत रहायचं....

पुन्हा नव्या उमेदीने, नव्या आशेने आपलं जीवन भरभरून जगायचं....

आतल्या जख्मा ओल्या असल्या तरीही.......... 

शेवटी काय *तुफान तो आना है......आकर चलें जाना हैं ........* अस गुणगुणत वादळात नष्ट झालेल्या गोष्टी ठिक करत करत जीवन जगत रहायचं.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy