Deepali Mathane

Inspirational

4.7  

Deepali Mathane

Inspirational

स्टोरी मिरर.........

स्टोरी मिरर.........

1 min
316


*अगणित मायेचं लेणं म्हणजे साहित्य क्षेत्र.*

आपल्या भाव-भावना शब्दांवाटे उधळून शब्द ओंजळ रिती करायला गेलो की, ती अक्षय पात्राप्रमाणे पुन्हा भरून तयार असते.

कथा, कविता, चारोळ्या, अभंग, भारूड, भावगीते, भक्तीगीते अशा कितीतरी काव्य प्रकारांची *दीपमाळ* साहित्य क्षेत्राचे तेजोवलय वाढवते. वाचन-लेखन कलेची आवड मनापासून जोपासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची साहित्य क्षेत्रासोबतच्या नात्याची वीण ही साक्षात *भगवद्गीतेप्रमाणे* समर्पक आहे. लेखणीला फुटलेला मायेचा पाझर हा शब्द-शब्द वहावत एक लोभसवाणा झरा बनून कितीतरी जीवांना सुखावून जातो. साहित्य क्षेत्रास लाभलेल्या असंख्य साहीत्यीक मंडळींना कायम आपल्या अस्तित्वाची सुवर्णमयी आभा प्रकाशित करण्यास लाभलेलं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे *स्टोरी मिरर.* अनेक नवोदित कवी-कवयित्रींना व्यक्त होण्यासाठी *स्टोरी मिरर* म्हणजे एक जीवा-भावाचा सखा. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational