Deepali Mathane

Others

2.5  

Deepali Mathane

Others

घर असावे घरासारखे

घर असावे घरासारखे

2 mins
310


विमलताई लिमये यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे,

*घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती*


        किती गहन अर्थ दडलेला आहे या चार ओळींमध्ये घराबद्दल ची ओढ का असावी? याबद्दल अतिशय संक्षिप्त शब्दांमध्ये घराचे महत्त्व समजून दिले आहे. त्यामध्ये असलेला प्रेम जिव्हाळा आपुलकी हाच आपल्या घराचा आधार असतो. प्रत्येक नात्याने येथे समाधानाने हसावे एवढेच अपेक्षित असते. सुख दुखात एकमेकांना मायेचा ओलावा पदोपदी जाणवतो आणि तो जाणवावाच असे मला वाटते.


    घरात असणाऱ्या प्रत्येकाचा स्वभाव वागणूक ही व्यक्तिपरत्वे भिन्न-भिन्न असू शकते. पण आपल्याला नाते जपताना त्यांच्याशी जुळवून घेणे जमायलाच पाहिजे. प्रत्येकाचा स्वभाव हा सारखा नसल्यामुळे कधीतरी रुसवे-फुगवे वाद-विवाद हे चालणारच हे गृहीत धरले आहे. तेव्हा कधी संयमाने कधी समजावणीच्या सुरात आपल्याला त्या व्यक्तीला आपलेसे करून घेणे जमायलाच हवे. उगाच त्या व्यक्तीचा राग करून किंवा त्याला घरातून हाकलून देऊन कधीही प्रश्न सुटणार नाहीत. आणि उगाच एका घराचे दोन घरं करून आपण काहीही साध्य करू शकणार नाही तर त्या व्यक्तीच्या स्वभावातला न आवडलेला भाग बाजूला सारून सकारात्मक विचारसरणीने आयुष्य जगत जावे. माझ्याही स्वभावातला एखादा भाग कुणाला आवडत नसेल तर तर मी देखील त्यात सुधारणा नक्कीच करेल.जेणेकरून कोणालाही माझ्यापासून त्रास होऊ नये ही एकच अपेक्षा. शेवटी जेव्हा आपण एका घरात राहतो ते आपले घरच आपले सर्वस्व असते आपल्या अस्तित्वाची खाण असते. समाजात वावरताना येणाऱ्या संकटांना तोंड देताना घरच्यांची साथ ही अतिशय मोलाची असते.


    सिमेंट विटा रेतीनी बनलेलं चार भिंतीचे कुंपण हे घर नसतं तर त्या घरात असलेली आपली मायेची, हक्काची माणसं यांनीच आपलं घर उभं राहत असतं. स्वच्छ सुंदर समयीच्या तेजापुढे जसे आपण नतमस्तक होतो. तशीच भावना जर घराबद्दल असेल तर आपलं घर हे आपल्या खूप मायेचं मायेच्या ओलाव्याचं आपलं अगदी आपलं असं एक हक्काचं श्रद्धा स्थान म्हणजे आपल्या घरातली माणसं. जिथे ही मायेची माणसं उभी राहतील फक्त तेच आपलं घर.

...........यावरून एक गाणं आठवलं जे अतिशय समर्पक आहे

     *ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना हो ग़र तो पहले आ के मांगले तेरी नज़र मेरी नज़र.......... ये घर बहुत हसीन है ................ये घर बहुत हसीन है*


Rate this content
Log in