STORYMIRROR

Deepali Mathane

Others

2  

Deepali Mathane

Others

कोरोनाला हरवू या...

कोरोनाला हरवू या...

3 mins
99

*कोठून एक निर्जीव विषाणू आला.........*

*बघता बघता सगळीकडे हाहाःकार माजला..........*

     वरिल ओळी ह्या स्वलिखित आहेत.


     पण खरच आहेना.........आज संपूर्ण विश्वावर कोरोना या महामारीच अफाट साम्राज्य पसरलेलं दिसतयं. कोरोनाच्या विळख्यात सामान्य माणसापासून ते देशाच्या पंतप्रधाना पर्यंत सगळ्यांना आपल्या तावडीत घेतले आहे. कुणीच कधीच अशी कल्पना पण केली नव्हती की, आपल्या स्वतः च्या घरात माणूस कैद होऊन जाईल.आणि ते गरजेच देखील आहे. नाही तर जीव जायचा न.........कुणास ठाऊक कोण , कुठे, कसा कोरोनाचा वाहक असेल.


    शासनदेखील युध्द पातळीवर प्रयत्नशील आहे की नागरिकांची गैरसोय होऊ नये.तसेच वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत की, नागरिकांनी योग्य ती कुठली काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शासन आपलेआदेश व धोरण नागरिकांपर्यंत टी.व्ही.,रेडिओ द्वारे पोचवत आहे. पोलीस दल तर अहोरात्र आपली ड्यूटी पार पाडत आहेत.स्वतः च्या घरात न जाता बाहेर बसून जेवतांनाचे किती तरी पोलिसांचे व्हिडीओ आपण बघितले. खरचं सलाम यांच्या समर्पण भावनेला .👏🏻👏🏻 आपली माणसं आपलं कुटुंब एवढा संकुचित विचार न करता *हे विश्वची माझे घर* या भावनेने आपल्या देशबांधवांना जीवापाड जपणारे हे आपले रक्षक खरच वंदनीय आहेत. रस्त्या-रस्त्यावर उन्हातान्हात उभे राहून सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे याची खबरदारी घेतांना दिसतात.आपली त्यांच्यासाठी वेगळ अस काहीही न करता आपण जर सहकार्याची भूमिका योग्यरित्या वठवली तरी पुरे! शेवटी काय हो *जान है तो जहाँन है* या उक्तीनुसार आपण आपल्या बरोबरच समाजातील इतर सदस्यांची देखील काळजी घेणे जरूरी आहे.शासनाने अवलंबलेले लॉकडाऊनच्या धोरणाचे स्वागत करून प्रत्येकाने आपापली जबाबदारी नैतिकतेने पार पाडावी. त्यासाठी वेगळ काही करायच नाहीय तर फक्त आपल्या घरात सुरक्षित आणि आरामात रहायच आहे. आणि एवढं तर आपण सहजच करू शकतो. तसेच आपल्या आजूबाजूच्या गोरगरिबांची योग्य ती मदत आपण आपापल्या परीने आपल्या घरूनच करू शकतो. एवढ केल तरी पुरे आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात लॉकडाऊनचा अवलंब फार लवकर करण्यात आला त्यामुळे आपल्या कडची परिस्थिती नियंत्रणात आहे. नाही तर मोठ-मोठे देश जे महासत्ता म्हणून नावारूपाला आहेत ते आज कोरोनापुढे हतबल झालेले आपण बघत आहोत.हे कुणापासून लपलेलं नाही. यापेक्षा अगतिकतेचा तो कळस कोणता असेल. याचा विचार करा. 

असो!


   आपल्यासाठी अहोरात्र झटणारा आणखी एक गट म्हणजे वैद्यकीय शाखेत कार्यरत असलेले सगळेच आपले देशबंधू यांना तर मानाचा मुजरा जरी केला तरी कमीच पडेल. कारण म्रुत्यु डोळ्यासमोर वावरत असतांना देखील म्रुत्यूच्या डोळ्यात डोळे घालून समोरच्या रूग्णांना कस बर करता येईल यासाठीच त्यांची धडपड चालू असते. *खरोखर आमच्या कातड्याचे जोडे करून जरी यांच्या पायात घातले ना तरी ते कमीच पडणार.इथेच जाणीव होते ईश्वराची आणि त्याच्या अगाध सत्तेची.* आपण खूप स्वार्थी आहोत इतक प्रचंड समर्पण आणि त्याग आपण करू शकत नाही. अहो!...........साध आपण सहकार्यच तर करू शकत नाही बाकीच तर दुरच राहीलं. पहा करा गांभीर्याने विचार. *हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या.* या ओळींमधील देशाविषयीची तळमळ थोडीतरी आपल्या मनात आणि आचरणात जागवा.............. शेवटी काय हो !...... *फुल ना फुलाची पाकळी यानुसार आपण आपापला खारीचा वाटा नक्की उचलूया.*

 

पुन्हा एकदा सगळ्यांना एकच विनंती की, आपले पोलिसदादा, डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपापल्या परीने सहकार्य करा. त्यांचा आदर करा. कृतज्ञतेची भावना अंगी बाणा. शासनाच्या आदेशाचा, धोरणांचा अवलंब करा.तेव्हाच ही लढाई आपण खऱ्या अर्थाने जिंकू. शेवटी सगळं आपलच आहे . *वसुधैव कुटुबकम्* ही उक्ती सार्थक करण्याची हिच खरी वेळ आहे . तेव्हा आपापली भूमिका योग्य रितीने पार पाडून एक आदर्श प्रस्थापित करूया आणि कोरोनाला हरवू या...


Rate this content
Log in