akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

विक्रम वेताळ

विक्रम वेताळ

2 mins
351


राजा विक्रमादित्य आपल्या बुलेटवरून फेरफटका मारण्यासाठी संध्यकाळी निघाला. साडेसहाची वेळ. बाहेर हळूहळू अंधार पसरू लागला होता. पक्षी आपल्या थव्याकडे झेप घेत होते. वाऱ्याची झुळूकही मस्त येत होती. राजा चारही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या रस्त्यावर पोहचला. तेवढ्यात त्याला पाठीमागे कोणीतरी बसल्याच्या आवाज आला. बुलेट स्लो केली आणि मागे वळून पहिले तर वेताळ... 

"अरे आता तरी माझी पाठ सोड."

"काय राजा तुला सोडू."

"नाहीतर काय मी जिथे जातो तिथे तुला यायलाच हवं का"?

"हा हा हा हा"

"हसतोय काय कशाला बसलास तू माझ्या बुलेटवर."

"अरे राजा मी तुझी पाठ कधीच सोडणार नाही हे पूर्वी सांगितलेलं आणि आताही सांगतो."

"काय हवंय काय तुला"?

"तुझं डोकं खाण्यात मला खूप मज्जा येते."

"तू ना वेताळ कधीच सुधारणार नाहीस."

"हो का. बरं म्हण मी तुझ्या मानकुटीवर बसलो नाही."

"बरं काय तुझं आहे ते सांग आणि निघ उगीच माझा चांगला मूड खराब करू नकोस."

"ओह्ह्ह मूड काय, एके काळी रानात पायी फिरायचास. आता बुलेट मिळाली म्हणून भाव खातोस काय."

"ये वेताळा कशाला मला त्रास देतोस बोल पटकन."

"बरं माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे मग मी जाईन."

"बरं पटकन बोल."

"तुझ्या राजमहालातील वायफायचा पासवर्ड काय"?

"तुला कशाला हवा पासवर्ड"

"कशाला म्हणजे"

"तू तर रानीवनी भटकणारा"

"वाह रे वा. तू बदललास आणि मी रानीवनीच भटकायचं."

"मग काय तुझं एक ठावठिकाण असतं का"?

"आता माझं एकच ठिकाण तुझ्या राजमहालाशेजारी असलेल्या झाडावर वायफाय कनेक्टिव्हिटी छान मिळते तिथे."

"काय तुला वेड लागलं का."

"हा हा हा... पासवर्ड सांग. मग मी सतत ऑनलाईन असेन. इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सअँप आणि तुझ्यावर नजरही असेल माझी."

"पुरे पुरे निघ इथून पासवर्ड हवा म्हणे."

"मी काही पासवर्ड मिळाल्याशिवाय जाणार नाही आणि नंतर तू पासवर्ड चेंज केला तर तुझी  खैर नाही राजा..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy