Vada Pav, The Mumbai’s Burger
Vada Pav, The Mumbai’s Burger
#vadapav
#vadapavlove #vadapavchutney
Indian Burger with Spectrum of Chutneys
पूर्ण दिवस काम करून करून थकून गेलो होतो. ऑफिस सुटल्यावर मी खाली उतरलो. तस्स.. तस्स.. काही तरी आवाज आला आणि खमंग सुवास आला. पोटात भुकेने कावळे ओरडत होते तेच पाहतो तर काय समोर म्हणजे रस्त्याच्या पलीकडे एक भली चांगली गर्दी होती. अगदी लहान मुलां पासून ते वृद्ध लोकांपर्यंत गर्दी जमली होती.
काही अगदी गरीब तर कोणी लांब सडक चमकणाऱ्या Imported Car मधये बसण्यार्या लोकांची
मी जरा विचारातच पडलो आणि त्या टपरी वर काहीतरी लिहिले होते. त्यावर माझी नजर पडली. ते वाचून माझ्या जीवात जीव आला आणि काही विचार न करता मी पटकन उडी मारून रोड क्रॉस केला आणि त्या टपरी चा मी देखील एक भाग झालो. तर त्या टपरी वर लिहिले तरी काय होते? करा काही विचार... समजल का काय ते? अहो त्या टपरी वर लिहिले होते गणेश वडापाव सेन्टर.
वडापाव हा असा एक इंडियन Fusion आहे जो खाताच पोटातले कावळे शांत होतात बरंका. जिभेला त्याचा जो चवना लागतो तो अगदी मनमोहीत असतो. तोंडात सुटणारी जी लाळ अस्ते ती त्वरित जिभेला शांत करते. खमंग व गरमागरम वडापाव खाऊन जिभेला बसलेला जो चटका असतो तो लाळेच्या धारिने अगदी नाहीसा होतो.
वड्याची शान हीं अगदी निराळीच अस्ते. अगदी अळणी पण नव्हे, तर्रर्र खारट ही नाही. तिखट तर्रर्र मुळीच नाही पण झणझणीत नक्कीच. तिखट खाद्य जिभेला मुळीच सहन होत. नाही पण झणझणीत खाद्य हे जिभेवर लोळून पोटात कधी पोहोचते ह्याचा पत्ता लागताच नाही. असा अस्तो हा वडापाव.
सोबतीला जर का कट्टिन्ग चहा ची संगत आणि जोमात असलेला जोरात पाऊस असला तर मग मज्जाच वेगळी येते.
मग आठवण येते तिची. तिची अर्थात Cigarette ची.
Cigarette चा हवेत उडणारा धूर आणि तिच्या त्या बारीक आणि छोट्याश्या ठिणग्या एक वेगळाच मोहोल अस्तो. Cigarette ला दोन बोटात धरून रुबाबात सट्टा मारायचा आणि गरम चहा ची चुस्की व गरमागरम वडापाव चा घास हा एक निराळाच आनंद अस्तो.
हो... वडापाव.. !!! पाव हा वाड्याची कायमची संगत जशी अस्ते एका नवऱ्याला त्याच्या बायकोची आणि प्रियकराला त्याच्या प्रेयसीची.
तर्रर्र आता आपण वळूया चटणीकडे जी वाढवतेय वडापाव ची अस्सल शान. चटणी ची एक निराळीच identity अस्ते. कधी गोड़ तर कधी तिखट, कधी झणझणीत तर कधी फिक्कट, कधी लाल तर कधी हिरवी किव्वा पिवळी, कधी सुक्की तर कधी ओली.
'जसा माणूस तशी चव,
जशी चव तशी ओळख,
जशी ओळख तशी Public अर्थात गर्दी.
गर्दी means customer बरंका!!!'
आयुष्य चक्क एक Mathematics असतं.
वडापाव पण एक असंच साधन आहे ज्याने पूर्ण calculation चेन्ज केल आहे.
वडापाव चा जन्म झाला in the year July-August 1966 मध्ये. अशोक वैद्य(एक कट्टर शिव सैनिक ) ह्यांनी संशोधन काढला होता ह्या स्नॅक चा.
सांगण्याचं तात्पर्य अस कि हा प्रॉडक्ट आता एक्दम Branded झाला आहे agdi "From Local To Global", inshort Glocal !!
उदाहरण तर पहा, गोली वडापाव, जंबो किंग, कुंजविहार वडापाव. ह्या सगळ्या जॉइंट्स च्या शाखा प्रत्येक शहरात सुद्धा आहेत पण अशें ही काही जॉइंट्स आहेत जे फक्त We Are Only One Edition ह्या कॅटेगरी मध्ये पडतात आणि ह्यांची मात्र एक भारीच चव अस्ते ज्याला आपण इंग्लीश मध्ये SIGNATURE TASTE असे म्हणतो.
कीर्ती वडापाव, ग्रॅजुएट वडापाव, अाराम वडापाव, गजानन वडापाव ह्या सगळ्यांची चटणी अगदी वेगळीच आहे. एक चटणी तर अशी आहे ज्यात चाळीस ingredients use केले आहेत. दुसरी चटणी तर अशी ज्यात हिरवी मिरची, लसूण,
खोबरे व चिंच चा वापर केला आहे. तिसऱ्या चटणी मध्ये वापर केला आहे बेसन च्या पिठाच्या व हिरव्या मिरची चवि नुसार.तर एकाची चटणी आहे टोमॅटो ची
वडापाव चे Variants पण अनेक आहेत बरकां
उदाहरण; चिकन वडापाव, शेझवान वडापाव, चिनी वडापाव
प्रत्येक वडापाव ला आपला वेगळाच Personal touch आहे ज्याला साथ आहे specialised चटणी ची. ह्याला BENCHMARK म्हणाले तरी चालेल.
माझा नंबर आला.मी काका ला म्हणालो, "काका, मला एक वडापाव द्या."
त्याननें मला एका प्लेट वडापाव दिला ज्यात सोबतीला होती फ्राईड हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा व बीटरूट ची काप. चटणी होती खोबऱ्याची आणि पुदिन्याची ज्याला जिरे, लाल मिरची व कडीपत्ता चा तडका दिलेला होता. वडा तर अगदी सोनेरी रंगाचा दिसत होता. त्याचे कोटिंग अगदी Crispy & Crunchy होते. पाव पण super fluffy होता. मी पटकन तो वडापाव संपवला पण भूख काही मिटेना व मोह काही सुटेना म्हणून अजून एक प्लेट खाल्ला.
तेवढ्यात लक्ष्यात आले कि सगळ्या प्रकारच्या लोकांची भूख भागवतो हा वडापाव अगदी गरिबां पासुन ते अमीर लोकांन पर्यँत.Infact, it is a snack which is available & ready to grab (eat ) 24*7
वडापाव आपल्या मुंबई ची एक जानी-मानी शान आहे म्हणून तर आपण म्हणतो, "आमची मुंवई."
मी तो वडापाव संपवला व घरी येण्या करता Bus घेतली
