मानवी प्रवृत्ती
मानवी प्रवृत्ती
असच एकदा मी, हरीश आणि नित्या फिरायला निघालो होतो. बोलता बोलता माझ्या एका मामांचा विषय निघाला. मी हरीश ला म्हणाले,"किती शांत स्वभाव आहेना मामांचा. किती सुरेख बोलतात. चेहेरा कायम हसमुख असतो त्यांचा. नेहमी बाई- ए-बाई करत असतात मला.” हरीश म्हणाला, “बाई हा गावातला प्रेमाचा शब्द आहे. प्रेमाने बाई असेच हाक मारतात.” हो, माझ्या लहान पणी माझे पप्पा पण मला बाई असेच म्हणायचे पण मी खुप चिडायचे… आता मला कळाले आहे तर पप्पा मला नावानेच हाक मारतात… आलेना तुम्हाला पण खुदकन हसू? मला पण आले होते. बरं, मग हरीश म्हणाला, “आरती, माणसाचा स्वभाव त्याची परिस्थिती बनवते." प्रत्येकांचा स्वभाव हा वेगळाच असतो. कोणाचा प्रेमळ, रागिट, निरागस, मायाळू, दयाळु, क्रुर, संशयी, स्नेह, सहनशील, भांडखोर, सौम्य, शांत. “व्यक्ती तितक्या प्रकृती”, असे म्हणतात…काही लोक तर असे असतात की चुका अनेक वर्ष लक्षात ठेवतात व समोरच्याला माफी देत नाही…त्याने होते असे की वेळ तिकडेच स्थिर राहतो आणि प्रगती थांबते… ती पण तिचा स्वभाव दाखवणारच…
मित्रांनो , माझे असे म्हणने आहे की तुम्ही एकदा छान लोकांभोवती रहा जिथून तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स आणी एनर्जी मिळेल.. जिथे तुम्हाला मोकळा श्वास घेता येइल. हसायला व हसवायला शिका, बागडायला लागा.. "आपल्या प्रत्येकामध्ये एक मूल आहे" अस म्हणतात.. पण मी म्हंणते, "लहान व्हा आणि खेळू द्या." स्वतंहाचे एक सुंदर जग बनवा जिथे तुम्ही पूर्ण उत्साही असाल. एखादा चान असा छंद निवडा. पर्यावरणीय घटकांचा माणसावर आणि त्याच्या ओळखीवर प्रभाव पडतो त्यामुळे तुमच्या सभोवतालचा परिसर सकारात्मक उर्जेने ठेवा.
"स्वभावाला औषध नस्ते"' असे म्हंणतात पण असही म्हंणतात की, "तूच तुझ्या आयुश्याचा शिल्पकार."
तुम्ही तुमची स्वतःची आवृत्ती व्हा, बाकी तुमही समझदार आहत…
