STORYMIRROR

Revati Shinde

Classics

4  

Revati Shinde

Classics

वास्तु नमः

वास्तु नमः

1 min
11

,"आई, अण्णा चला, टेम्पो आलाय" " तू हो पुढे आम्ही आलोच" "आई जरा लवकर म्हणजे उशीर होतोय, पुढे ट्रॅफिक मिळेल" निमिषा जिन्याकडे जात .म्हणाली.

"पार्वती चल" "कशी येऊ, सांगा ना ,या वास्तूला सोडून. अहो, किती आठवणी आहेत, सुखाच्या ,दुःखाच्या. किती प्रेमाने, कष्टाने बांधलेली आपली ही वास्तु  कधीच तिला एकटं सोडलं नाही आणि तिनेही आपल्याला."त्यांना हुंकार आवरेना. "

"पार्वती अगं मलाही खूप वाईट वाटतंय पण नाईलाज आहे. वास्तवाचे भान ठेवायलाच हवे. मुलांनाही त्यांचे संसार उभारायचेत,त्यांचीही काही स्वप्ने   आहेत मग आपण नको का त्यानां मदत करायला आणि आपल्या वास्तुचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतो आपण कुठेही असलो तरीही."

 खरं तर श्रीकांतरावांचीही पावले जड झाली होती .मग त्या दोघांनीही त्या वास्तुला नमस्कार केला आणि ते निघाले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Classics