Anup Salgaonkar

Thriller Others

2.4  

Anup Salgaonkar

Thriller Others

वाडा

वाडा

3 mins
687


माजघरातल्या उंची फळीवर हळदीच्या कापडात गुंडाळलेली तीन शेंदूर फासलेली लिंब सापडली तसो म्होरक्या गावभर बोंबलत फिरलो, "तात्यांच्या वाड्यावर कुणीतरी करणी केली." इकडे घरच्यांची तोंडा सुकली. तात्यांच्या उभ्या जन्मात वाड्यात असां काही अभद्र घडूक नाय. आजीच्या डोळ्याक पदर लागलो. सगळो वाडो माजघरात गोळां झालो. समुद्र किना-यावर कायरकरांचो ह्यो मोठ्ठालो वाडो, उठ-बस करुक १५-२० माणसां, परसदारी तुळशीचा वृंदावन, त्या तुळशीत पाणी घालून भल्या पहाटे आजेन श्रद्धेनी खोवलेली आगरबत्ती वाडाभर दरवळूची. सगळो वाडो सांजेला दिव्यांनी मंदिरासारखो उजळून जाऊचो. अशा या पुर्वजांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या वाड्यात, भरल्या घरात ही अशी दळबद्री घटना घडली ज्याने प्रत्येकाच्या डोळ्यांत लाल भिती दाटू लागली. श्री. भगवान दामू कायरकर यांच्या करारी स्वभावामुळे वाड्याकडे वाकड्या नजरेने बघूची आजतागायत कुणाचीही हिम्मत होऊक नाय. या एका घटनेने वाड्यातील वातावरण पार ढवळून निघाला होतां या मात्र खरां. आजी "ह्या कायता बघूक व्हया, पोराबाळांनी भरलेल्या घरात ह्या असा अभद्र घडलां तां उतरवूचा लागतलां, मनातली कोळीष्टकां गडद होऊच्या आधी वेळीच साफ करुक व्हई."


आजीच्या शब्दाक प्रमाण मानून " कुणाचा मरण जवळ इला....!!!! ता मी बघतयं" तात्या गरजून घराबाहेर पडले. वेशीवरल्या गूरवाला बोलावणा धाडलां. सामानाच्या पोतडीसकट गुरव तातडीनं इलो, सगळो वाडो निपचित पडलो होतोे, घरचो वासो न वासो शांत उभो होतों. घरची कुत्री आडाजवळ जाऊन बसली होती. कुणाचो कुणाक एक शब्द नाय. गुरवानं घरभर फिरुन अंगारे फुंकून मंत्र पुटपुटले. आजीकं कायतां सांगून माडीवच्या फळीवर केळीच्या पानात मूदभर भात, तांबडी - पिवळी भूकटी आणि मुठभर अभिर लावून शेंडीवालो नारळ ठेवलो. सगळ्यांका परसात बोलावणा घाडलां, "आज सांजेपातूर कुणी घराबाहेर जाऊचा नाय. ह्यो फेरो फार वाईट हां, सांज झाली की दार लावून घेवा, कोंबडो आरवल्या शिवाय दार उघडूचा नाय." अशी सक्त ताकिद देवून गेलो.


गुरवाची पाठ फिरल्यावर तात्या आवेगाने आजीला म्हणाले, "सकाळ पातूर धिर धरा.......ज्या कुणी ह्या केला हां.......ही करणी त्यावरचं उलटतली...... तळतळाट होतलो......मेलो जिवानीशी जातलो......." सांजेच्या आधीच जेवणांवळ आटपून दार बंद झालां. पण, तात्यांचो विश्वासातलो नोकर दिगू माळावरुन परतलोच नव्हतो. सकाळपातूर तां माडावरुन नारळ उतरवूचा काय तां काम काढलां होतां. आज्येपाठी सगळ्यांका त्याची काळजी. लहानाचो मोठ्ठो ह्याच वाड्यात झालेलो. तात्यांवर त्याचो लई जिव. सगळी कामां अगदी न सांगता वेळच्या वेळी करुचो, तात्यांका कसल्याच कामाची कधी आठवण करुन देवची गरज पडूक नाय. सकाळी परसातली सगळी कामा, वाणसामान, गुरां- ढोरां, पत्रा-पोचपावते सगक्याकडे कटाक्षान लक्ष असायचां. त्याच्या या न येण्यांन आजीक पण रातभर डोळ्याक डोळो नाय. नुसती अंथरुणार पडून , "दिगू..... दिगू..... दिगूक घेऊन यवां..... दिगूक शोधा......" म्हणून पुटपुटत रवली. ही रात्र सहजा सहजी सरुची नाय, घड्याळाकं तर काय धाड भरली जाना कोनं..? घड्याळ बाराचे ठोके देवून जा थांबला तां पुढे चालूकचं नाय, त्या ठोक्यां पाठोपाठ मांजरा दात विचकावत रडू लागली तशी घरच्यांच्या आंगावरुन ही शिरशिरी... सगळ्यांचे डोळे सताड उघडे... पंख्याची घरघर-हृदयाचे ठोके मोजीत व्हती... रातभर ह्योच खेळ म्हणता म्हणता सगळे आवाज कानाजवळ येईनासे झाले...


तेवढ्यात कोंबडो , " काँ.. क...काँक.... कँक......" एवढ्या जोरानं ओरडलो की सगळे दचकान अंथरुणात उठान बसले. तात्या आणि आजी पाठोपाठ अख्खो वाडो दारापाठी जमलो. तां सागवानी दार, त्यावरची लाकडी कडी, त्या पाहाटेच्या अंधारात आजीनं हाती घरलेल्या कंदिलाच्या उजेडात तात्यांकां स्पष्ट दिसली, तात्यांनी नजरेचो एक कटाक्ष आजीकडे टाकलो आन दाराची कडी सरकवून दार जोरान बाहेर ढकललां आणि... सगळीचं जागीच थबकली, कुणाचोच पाय उंबरठ्या बाहेर पडूक नाय... बाहेरच्या वाऱ्यांन सुर्र्सुर्र करत वाड्याचो ताबो घेतलो... कंदिल फुटानं विझलो... तात्यांच्या कपाळातून घामाचे दोन थेंब जमिनीवर पडले... आजीनं पदराचा बोळकां तोंडात कोंबला... डोळे विस्फारुन सगळी परसात पाहू लागली... सुन्न नजरेनं... निश्चल देहानं... परसात आक्रीत घडला होतां... अंगण लाल रंगला होतां... करणी उलटली होती... ह्यो रक्ताचे उलटे करुन, त्या रक्ताच्या थारोळ्यात, डोळे हे आभाळात चढवून... एका हातात अभिर फासलेल्या नारळाची शेंडी धरुन... मान मोडून... दिगू पडलेलो होतो. निश्चल... निपचित...

कर्मण्य गति बोधव्यं..!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller