उदया
उदया
रामा शेतावर गेला होता भल्या पहाटे आज भात काढणी करायची होती . त्यांची न्याहारी घेवून मला लवकर जाण्या साठी स्वयंपाक करून निघायचे पोरगा शाळेला जात होता यंदा१०वी लाव्हता नवसाच पोर बापान कधी शेतीकामाला जुंपला नाही मोठसाहेब व्हाव अशी बापाची इच्छा होती पोरग प्रामाणिक पणे शाळेला जात लय हुशार मास्तर म्हणत होते बापाला हुरूप येत शेतात बैलाप्रमाणे राबत कधी हौस मौज नाही का यात्रेला नाही पोरग दहावी पास झाल साऱ्या गावभर पेढ वाटल तालुख्यातनबंर आला मास्तर घारि आले बा"ला लय आंनद झाला खोलीत जावून रडला गोदे आपल्या पोराने नाव कमवल ग ? मला शाळेच तोंड नाही भेटल पाह्यला पण पोरान शाळा घरला आणली मोठ्या गुण्यागोविंदाने आमचा संसार चालु होता .कॉलेजला पोरगा शहरात गेला ११वी ला प्रवेश घेतला डोक्यात खुळ घेतल मला सैन्यात भरती व्हायचे रोज पहाटे उठायच रस्त्याने पळत सुटायय कसरत करायची शरीर पिळदार बनवायच दोन वर्ष घातली १२वी चांगल्या मार्काने पास झाला .सैन्य भरती निघाली कि सर्व सोडून निघायचा इकड बापाला अंगाला काटा यायचा गोद आपल एकुलत एक नवसाच पोर लांब जाव अस नाही वाटत जवळ रहाव म्हातारपणी आपल्याला सांभाळाव व सुखाने मा तित घालाव मोठसाहेब व्हावपण सैन्यात जाण्याच खुळ काढाव पण नाही खूप प्रयत्न केले . उदया दुसऱ्या जिल्हाच्या ठिकाणी भरती हाय दोन चार दिवस लागतील म्हणाल . रात्रभर बाप झोपला नाही गोदा धनी काय झाल ? गोदे उदया पोरगलांब जाईल या भितीने मला एकट एकट वाटत . अहो . उदयाचा इचार आज नका करू दोन तीन भरतीला परत आल . कि डोक्यातून खूळ जाईल आपोआप लाख दोन लाखातून चार पाचशे पोर घेतात म्हणे चारदा परत आल तस येईल झोपा आता बापाचा पोरावर लय जीव होता . त्याचा बीना जेवत नव्हता .भल्या पहा टे पोरग उठल पिशवी भरली माय ने दोन चार भाकऱ्या अन मिरचीचा हिरवा ठेचा दिला एक चादर टॉवेल कपडे घेतले अन् गेला . चार दिवस झाले निरोप नाही गावात पाटला कड एकच फोन व्हता पोरग निरोप धाडल पण सहा दिवस झाले ? इकडे तिसऱ्या दिवशी राजूचा नबंर आला सर्व चाचण्या पास झाला फायनल भरतीसाठी दोनशे पोर काढली त्यांची परत दोन दिवसांनी चाचणी ' परिक्षा घेणार होते त्यामुळे आम्हाला तंबू सोडून बाहेर जावू देत नव्हते . शेवटी साहेबाला इचारून गावात पाटलाकडे फोन लावला दोन दिवसात येतो परिक्षा बाकी आहे . घरि बाला निरोप मिळाला तवा पोटभर भाकर खाल्ली गोदे मला भ्याव वाटत जर पोरग खरच भरती झाल तर ?तीकडे दोनशे पोरातून शंभर पोर फायनल भरती झाली व लगेच त्यांच्या गाडीत टाकली व म्हणाले तुमची निवड झाली कॅम्पात ट्रेनिंग साठी ' निघाव लागेल घरि गेलात तर दोन दिवसात स्वतःच्या खर्चाने यावे लागेल .घरी गेलो तर बाप मला येव देणार नाही व मला बाप रडतांना पाहिल्यावर मला येता येणार नाही म्हणून मी घरि पून्हा फोन करून निरोप धाडला माझी सैन्य भरतीत निवड झाली .व उदयाच ट्रेनिंग साठी कॅम्पात जाव लागतय काळजी करू नका तिकड हजर होवून 8/10 दिवसात परत येतो बा"ला निरोप मिळाला अन त्याची झोप उडाली अवसान गळून पडल्यागत झाल दिवसभर शेतात गेला नाही . जेवण केल नाही गोद न समजुत घातली आव पोरग सैन्यात भरती झाल देशाची सेवा करण्या साठी मी माय हाय त्याची पोटचा गोळा आहे माझा ?त्याचा ई चार करा ? पोराचा आनंद . देशाची सेवा आपल्या धरणी मायची सेवा करणार हाय ? झोपा आता तूम्ही जशी काळया मातीची सेवा करता तशीच शेवटी मनातून काढल झोप लागली पण उदयाची चिंता मात्र जात नव्हती बा"ला उदया म्हटल कि धडधड व्हायच हळव मन अन प्रेम ' ' माया व लांब असलेल अतंर यायी सर्व उत्तरे व भविष्य बा" ला उद्या या शब्दात दिसायची त्या मुळे आजचा आनंद हिरावून उद्या च्या विचार करायचा बाकी माझ्या जीवनाची कहाणी मी "उदया " सांगेन.
