त्या दिवशी तू भेटलीस...
त्या दिवशी तू भेटलीस...
त्या दिवशी तू भेटलीस अचानक अन सारा, सारा भूतकाळ आठवला. जीवनाचा फ्लॅशबॅक पुन्हा गहिवरून आला. माहित नाही तुला काय वाटलं असेल? पण एवढं खात्रीनं सांगतो तू सुखी नाहीस. किती सहज म्हणाली होती तू झालं गेलं विसरून जा, पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करूया. आग तुमच्यालेखी असेल भलेही भातुकलीचा खेळ, वाटलं तर मांडावा अन वाट्टेल तेव्हा मोडावा. इतकं सोप्प नसत ग ते प्रेम कारण, निभावणं ... विसरणं ..
वाटलं होत जाऊ दे ना तू तरी सुखी आहेस ना तुझ्या घरट्यात. तू कोठोही राहू सुखी असावीस कारण मी निस्वार्थ प्रेम केली तुझ्यावर! खरं सांगू, तेव्हा वाईटही वाटलं होत अन तुझा क्षणभर रागही आला होता तुझा. तुझ काय तू बांधशीलच ग घरटं उंच झाडावर सुबक सुंदर, देखणं .. पिलांना भरवशील प्रेमानं .. करशील सुखी सगळ्यांना. पण .. मी मात्र आपल्या घरट्यासाठी काडी - काडी जमवून ठेवलीय केव्हाची अन तुझी वाट पाहत बसलोय तुझ्या प्रेमाच्या खेट्या सहानुभूतीवर. तुझ्या कारागिरीवर, तुझ्याठायी असलेल्या अंध विश्वासावर. वाटलं होत येशील अन घरात आपली प्रेमानं विनवशील, तोडून सारे पाश माझी होशील आपण रंगवलेलं स्वप्न साक्षात साकारशील. तू तर क्षणात दुसरं घरटं बांधून विसावलीही त्या घरट्यात ... नंतर मी च मला समजावलं होत स्वतः:ला अन मैत्रिणीकडूनहि समजलं तू सुखी आहेस खरंच बार वाटलं पण कसलं काय?
पुन्हा काही दिवसांनी तुझ्या मैत्रीणीकडनं समजलं तुझं घर पुन्हा विखुरलेलं ... तुझ्या पिलांचा आधार हरवला. सुखी संसाराला सोडून तो गेलाही तो अचानक तुम्हाला वाऱ्यावर सोडून. दोष त्याच नव्हताच मुळी पण नियतीपुढं कुणाचाही चालत नसत ग तेच खरं . खरंच मनापासून सांगतो खूप - खूप वाईट वाटलं ग ... दुःख तुझं डोंगराएवढं ऐकून मन हेलावलं . तू तर होतीसच खंबीर , धाडशी , मनमिळावू ... तू निभावशीलाही सगळं .. पण वाईट याचंच वाटत की, मी मैत्रीही नाही निभावू शकत ... सहानुभूतीचे चार शब्दही नाही बोलू शकत. याच शल्य मला माझ्या शेवटचं श्वासापर्यंत राहणार ग ... तू नाहीस जीवनात तरीहि तू सुखी असावीस असच वाटत. तुला भेटावं कधी तरी असच वाटत राहत. तू तर भिनलीय माझ्या रोमा रोमात, माझं समग्र जीवनच तू व्यापून टाकलंय माझं .. तू किती सहज म्हणालीस निर्दयीपणे विसरून मला जा तू ... तुझ्यालेखी असेल ग तो भातुकलीचा खेळ, केवळ व्यवहारवादी तडजोड, कारण तुही प्रेम केलस मी प्रेम केलं पण तू हातच राखून. मी समग्र जगणं उधळून ... तुम्हा स्त्रियांना प्रदस्तीहीशी जुळवून घेणं पटकन जमत पण आम्ही मात्र कोलमडून जातो ग .. तुम्हाला निदान रडून मोकळं तरी होता येत. आम्हाला तेही शक्य होत नाही नेहमी. जाऊ दे ना मी कसलं गाऱ्हाणं मांडतोय .. पण निदान तू तरी सुखी व्हावयास हवी होती ग एवढंच वाटत ...
जाऊ दे ग सोड. विसर सारं तुला पुन्हा नव्यानं उभं राहायला हवं. तुझ्या पिलासाठी .. त्याने पाहिलेल्या स्वप्नासाठी ... अन मला तरी तुला दुखी कुठं पाहाव वाटेल?