SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

ठिकाण

ठिकाण

2 mins
360


शांती एक अशी चाळीशीतली स्त्री.... मुलांच्या संगोपणासाठी नौकरी सोडून पूर्ण वेळ गृहिणीची भूमिका पार पाडत होती. आता तिचे दोन्ही मुलं कॉलेज मध्ये गेली.. त्यामुळे त्यांची आता विशेष जबाबदारी नव्हती..आता स्वयंपाक, घरातील काम आटोपल्यावर बराच वेळ तिच्या कडे उरत होता. आणि तिला आता जाणीव होत होती की नौकरी सोडून तिने खुप मोठी चुक केली..ती सतत हाच विचार करत होती.. अश्यातच तिला तिची कॉलेज ची एक मैत्रीण सीमा अचानक भेटली.. ती चांगल्या पोस्ट वर जॉब करत होती.. तिनी शांतीला विचारले तू काय करतेस तर ती म्हटली अग मी घरीच असते पण आता घर खायला उठते.. काय करावे कळत नाही.. सीमा तिला म्हणाली. अग तु माझ्यासोबत ट्रेकिंग ग्रुप जॉईन कर तुला खूप मजा येईल.. शांती म्हणाली अग मला आता सवय नाही कसे काय शकेल मी ट्रेकिंग.. त्यावर सीमा म्हणाली काही कठीण नाही ग जमेल तुला.. तु आधी सकाळी उठून वॉकिंग, जॉगिंग, योगा सुरु कर म्हणजे तुझ्या शरीराला सवय होईल आणि चल आमच्या सोबत पुढल्या महिन्यात ट्रेकिंग ला आम्ही राजगड ला जाणार आहोत.. पण रेग्युलर व्यायाम चालू ठेव तोपर्यंत.. शांती लाही आयडिया आवडली.. शांती म्हणाली ठीक आहे मी करते प्रयत्न आणि दुसऱ्या दिवशीपासून रोज 40मिनिट वॉक आणि योगा करू लागली.. कधी कधी जॉगिंग करू लागली.. त्यामुळे तिची मरगळ कमी झाली. तिला फ्रेश वाटू लागले. आणि ट्रेकिंग चा दिवस आला.. ती पहिल्यांदा ट्रेकिंगला गेली आणि खुप उत्साहाने ट्रेकिंग केले.. तिला खुप छान वाटले.. तिने तो सर्व अनुभव लिहिला व ब्लॉग वर टाकला तिचे तिलाच छान वाटले.. ती पुढे रेग्युलर ट्रेकर झाली आणि स्वतःचे vlog ही बनवू लागली. तिच्या vlog ला views मिळू लागले.. आणि ती प्रसिद्ध झाली.. वेगवेगळ्या ठिकाणाचा शोध घेण्याचा तिला आता छंदच लागला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational