टाईमपास
टाईमपास
विषय - टाईमपास
दिनांक -०९/०१/२०२६
टाईमपास
" किती वेंधळेपणा करशील गं स्वरा" , केवढी मोठी झालीस तरी
शांततेने कोणतं काम करत नाहीस.
आई ,स्वराला म्हणाली.. तिच्या रोजच्या बोलण्याची सवय झाली होती स्वराला.ती गालातल्या गालात हसत रूम बाहेर पळाली.
" स्वरा" एकलुती एक आईवडीलांची लाडकी छकुली..बाबांच तर काळीजच अभ्यासामध्ये हुशार पण चंचल स्वभावाची, अजून थोडी अल्लडपणा करणारी , तिला मित्र मैत्रिणी ही भरपूर होते. कॉलेज मध्ये
सगळ्यात मिसळून राहणारी ती आता नुकतीच सिनियर कॉलेज मध्ये
शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाणार होती.आई बाबा सुरवातीला तयार नव्हते पण तिच्या हट्टापायी शेवटी तयार झाले.
स्वरा आणि तिची मैत्रीण वृषाली दोघीही एकत्र जाणार होत्या,त्याचीच तर तयारी सुरू होती.आईच्या अनेक सूचना कानावर पडत आणि स्वरा आपल्या
नादात फोन वर बोलत होती.
दुसऱ्या दिवशी निघाल्या दोघीजणी ट्रेन ने ,दोघींचेही आई बाबा आले निरोप दिला.. ट्रेन थोड्या वेळाने सुसाट वेगाने धावू लागली.
स्वराचे मन मात्र पुढच्या प्रवासासाठी उत्सुक होते.ती वृषाली ला सारखी विचारत होती." कसे असतील तिथले फ्रेंड्स,तिथं राहायची सोय,जेवण कसे असेल,तिथले टिचर आपल्याला समजून घेतील ना? आपण किती दुरून तिकडे जात आहे."
वृषाली म्हणाली,ए स्वरा ,मी पण तिथं पहिल्यांदा जातेय, किती प्रश्न पडतात गं तुला? आता जरा शांत हो.. बाहेरच वातावरण बघ कसं वाटतंय,इकडचे रस्ते , डोंगर नवा भाग बघ जरा,थोडं हसत वृषाली ने
स्वराला गप्प बसवलं होतं.
थोड्याच वेळात पुढच्या स्टेशनवर एक तरुण मुलगा ट्रेनमध्ये चढला, आणि स्वराच्या कंपार्टमेंट मध्ये बसला.त्याच्याकडे भरपूर सामान होते तो ही बहुतेक ह्या दोघी सारखा लांबच्या प्रवासाला आला होता.
थोड्याच वेळात ट्रेन सुरु झाली.वृषाली सकाळी उठल्यामुळे थकली होती ती निवांत झोपून गेली.
स्वरा मात्र मोबाईलची गाणी ऐकत बसली होती.
खिडकीतून बाहेर बघताना त्या तरुण मुलाने तिच्या कडे पाहीले.तिच्या नवीन कॉलेज ची कागदपत्रे असणारी फाईल वरच ठेवली होती..ती चुकून खाली पडली. स्वराला हे काही लक्षात आले नाही.पण त्या तरुणाने ते पाहून,स्वराला विचारल, " तुमची फाईल खाली पडली बहुतेक, उचलून देत असताना आवाजाने वृषाली जागी झाली,स्वरा आश्चर्याने वृषाली ला म्हणाली,बघ हॉस्टेल चा नंबर बघायला काढली होती फाईल , आणि ती खाली पडली ' वृषाली म्हणाली,तू आहेसच वेंधळट, डोक्यावर टपली मारत असताना तिची नजर त्या तरुणाकडे वळली, तशी स्वरा त्याचे आभार मानू लागली.
तसा तो गालात हसला,व त्याने त्याची ओळख करून दिली..मी निरज , तुमच्या कॉलेज मध्ये मी ही शिकायला चाललोय, आपण आता फ्रेंड्स..स्वरा ने हलकीशी स्माईल दिली.
वृषाली ला मात्र पटकन कोणाशी बोलायचं जमत नसे, तिला कोणावर चटकन् विश्वास बसत नव्हता,हे स्वराला माहिती होतं.
थोड्या वेळाने कॉलेज बद्दल माहिती,आधीचे कोर्सेस,आता पुढे काय..अशा गप्पा सुरू झाल्या..आणि स्वरा ,निरज मध्येच वृषाली असा गप्पा टप्पांचा प्रवास सुरू झाला.
शेवटी एकदाचे ठिकाण आले..सामान उतरवून घेताना निरजची थोडी मदत झाली.आता हॉस्टेल शोधले आणि सारी व्यवस्था पाहिली आणि आईबाबांना कळवले.
कॉलेजच्या पहिल्या दिवशी सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या मित्र मैत्रिणींची ओळख झाली. कॉलेज कॅम्पस भारीच होता.नवीन स्वप्नांना नवी दिशा मिळणार होती.सुजय पण स्वरा आणि वृषाली ला भेटून, राहण्याची सोय कशी आहे ते विचारून गेला.
निरज मनाने चांगला आहे, काळजी ने त्याने आपली चौकशी केली असे वाटले..
हळूहळू दोघांमध्ये छान मैत्री झाली.
निरज लहानशा गावातून आला होता पण हुशार होता नवीन काही तरी करून आईवडील कुटुंब त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो एवढ्या लांबून आला होता.
स्वरा मात्र स्वप्नात रमणारी, मनमोकळा स्वभाव.. त्यामुळे सगळ्या कॉलेज मध्ये ओळखीची झाली होती.शिवाय अभ्यास आणि इतर कार्यक्रम मध्ये सहभाग असायचा,अशातच तिला स्वप्नील भेटला तो तिथलाच राहणारा, मोठ्या राजकीय घराण्याचा वारसदार, त्यामुळे त्याच्या पासून बरीच मुले चार हात दूर होती..पण स्वरा अभ्यासात हुशार म्हणून ह्याने तिच्या शी गोड बोलून मैत्री केली आणि बरीच कामे करून घेतली.
वृषाली मात्र स्वराला समजून सांगायची,पण मदत करण्यात तिला काही गैर वाटायचं नाही.
सारख्या नोट्स तयार करून देणं प्रॅक्टिकल मध्ये स्वप्नील ला मदत करणं चालू होतं,एकदा असेच सारे मित्रांचे टोळके आणि स्वप्नील बसले होते कॅन्टीन मध्ये आणि स्वरा चा विषय काढून स्वप्नील चे मित्र म्हणाले , तुला ती मदत करते पण इतर मुलीसारखी ती तुझ्या बोलण्यात फसणारी नाही." स्वप्नील चा इगो जागा झाला आणि त्यांने बोलत बोलत पैज. लावली "दोन महिन्यांत तिला घोळात घेऊन टाईमपास केला नाही तर माझे नाव स्वप्नील नाही,' सारे त्याला बघतच राहिले.
त्यातील एक जण निरजचा मित्र तो त्याला घडलेली गोष्ट सांगायला आला.ते ऐकून निरजची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने हे स्वरा ला सांगून तिला सावध करायचे ठरवले.
नंतर परिक्षा होती व त्यानंतर सुट्टी साठी सगळे आपापल्या गावी गेले.
इकडे स्वराला स्वप्नील रोज फोन करू लागला.. आठवण येते आहे असे दाखवू लागला,तिने कसे आपल्या मध्ये बदल घडवले आहेत ते सांगू लागला..स्वराला हे वागणं जरा वेगळं वाटू लागलं पण ती दुर्लक्ष करत होती.प्रत्यक्ष भेटीनंतर कळेल असं तिला वाटलं,..
निरज मात्र तिला सावध करायचे तर फोन वरून हे सगळं कसं सांगायचं हा विचार करू लागला.. वृषाली कडून तिला सांगितले त्यामुळे स्वरा सावध झाली.
सुट्टी संपली पुन्हा कॉलेज सुरु झाले.आणि पहिल्या दिवशी गार्डन मध्ये स्वप्नील ने स्वरा ला बोलावले..ती पूर्ण तयारीनिशी गेली.
स्वप्नील तिला म्हणाला,तू गावी गेल्यावर मला अजिबात करमत नव्हते,तू नेहमी मला साथ दिलीस आता हातात हात देशील का? मी अजून किती वाट पाहू ,स्वरा हसली त्यामुळे तो तिला मिठीत घेऊ पाहत होता.
पण तिने हात उंचावून इशारा केला तशा साऱ्या मुली पळत आल्या ज्यांची फसवणूक झाली होती ह्या टोळक्यातील प्रत्येकाने या मुलींसोबत टाईमपास केला होता..त्यांनी प्रत्येकाला धरून बेदम मारहाण केली.
पुन्हा मुलींना फसवले तर पोलिसात तक्रार करणार असे सांगून सोडून दिले.
टाईमपास भावनिक खेळ मनोवृत्ती चा नाश एका मैत्रीच्या नात्याने केला.
स्वरा ,निरज , वृषाली ह्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही ते एकमेकांचे जीवाभावाचे मैत्र टिकवून राहिले.
वेळा वेगवेगळ्या असतात काही जण टाईमपास करणारे तर काही जण वेळेत
आपलेसे होऊन मदत करणारे असतात.
@ सौ.प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर
