हळदी कुंकू
हळदी कुंकू
हळदी कुंकू (लघुकथा)
हळदी कुंकूवाचा मान घ्यायला सुवासिनी स्त्रिया तयार असतात" आपण ही छानसा छोटा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम
करू या का दिवाळीच्या निमित्ताने?' सरीता म्हणाली,पण सासूबाईंचे लक्षच नव्हते तिच्या बोलण्याकडे त्या फारच निराश झाल्या होत्या..दोन. वर्षा झाली सरीता चे सासरे जाऊन पण त्या अजूनही मनानेखंबीर नव्हत्या.. संसारात त्यांचें मन रमतच नव्हते. जन्मभर संसारातल्या सुखदुःखात एकमेकांना साथ देत आयुष्य काढलेआणि आकस्मिक निधनाने ते गेले.फारच हळव्या झाल्या अगदी
नातवंडामध्येही मन रमेना.सरीता तर किती प्रयत्न करायची..पण त्या हिरमुसल्या होत्या... जीवनातील रंग उडून गेल्या सारख्या..सरीताने त्या दिवशी एक उपाय शोधून काढला.
तो उपाय म्हणजे हळदी कुंकू कार्यक्रम ज्यामध्ये त्या आधी भरभरून प्रतिसाद द्यायचा.
तिने लक्ष्मी पूजन दिवशी लवकर उठून घरात सारी आवराआवर केली.. दारात मोठी सुरेख रांगोळी आणि त्यावर लक्ष्मी पावले काढलीत.फुलांनी सजलेले देवघर, मंद धूपाचा सुवास.., देवापुढे तेवत असलेले निरंजन भक्तीमय पहाट..आणि थंड गार वारा..पहाटेचे अभ्यंग स्नान घरातील सगळेच वातावरण उत्साही होते.सकाळीच जवळच्या सगळ्या मैत्रिणींना तीने आमंत्रण दिले . आणि आवर्जून जवळच्या नातेवाईकांना ही उपस्थित रहायला सांगितले.ती ने स्वतः लक्ष्मीपूजन करून हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमासाठी तयारी केली.
सासूबाई आवरून बसल्या पण स्वतःच्या खोलीतून बाहेर येणार नाही म्हणाल्या..जसे पाहुणे येतील तसे हळदीकुंकू समारंभ सुरू झाला..त्यांना सरीताने दिवाळी भेटवस्तू, फराळ
दिला.सासूबाई मात्र आतच बसून राहिल्या.. सरीता ला वाईट वाटत होते नविन घरी राहण्या आधी सासूबाई एका चाळीत राहायच्या तिथे शांता काकू काम करायच्या आज तिने मुद्दाम हून त्यांना बोलवले होते.
शांता काकू जरा वेळानेच आल्या पण पहिल्यांदा त्या सरीताच्या सासूबाईंकडे गेल्या.. नंदाताई अशी प्रेमळ हाक दिली
व हातात हात घेवून त्यांची विचारपूस करत होत्या.. किती कोमजलेला चेहरा तो नंदाताईंचा ..पण सरीताला त्यांनी शांता काकूं साठी पाणी फराळ आणायला सांगितले.
शांता काकूंनी आपली खुशाली सांगितली.. त्या म्हणाल्या नंदाताई "माझ मालक मला सोडून गेलं त्यो दिसं आठवा, माझ्या झोपडीत येवून किती आधार दिला तुम्ही मला माझ्या लेकरास्नी.. माझ्या डोळ्यातल पाणी तुम्ही तुमच्या पदरान टिपलं.. तुम्ही माझी पोरं शिकावीत म्हणून किती खटाटोप केला..आज माझी पोरं शिकून मोठी झाली मला दारोदारी हिंडून
काम करायची गरज राहिली नाही.आठवत का तुमास्नी एकदासंक्रांतीच्या हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमांसाठी तुमच्या घरी
सगळ्या चाळीतल्या बायका आल्या पण तुम्ही मी काम आवरून जात असताना मलापण त्या बायकांसारखा मान दिला
माझं डोळं तवा भरून आलं.आणि आज तिन्ही सांजेला दिवाळी दिवशी तुम्ही एकट्या अंधार करून का म्हणून बसला..
पुढं जायच कसं तुम्हीच. मला शिकवलं हाय..आता तुम्ही बाहेर चला बरं समद्यांच्या आनंदात मिसळून जा.. हीच आमच्यासाठी
दिवाळी भेट हाय बघा.. नंदाताई शांता कडे बघतच राहिल्या.. अजून आपल्या मुलाला सुनेला , नातवंडांना आपली गरज आहे
मनात आताच काळोख कसा करून चालेल.त्या आपणहून बाहेर गेल्या त्या दिवशी सगळ्या पाहुण्यांची गाठभेट घेतली.आणि संध्याकाळी नातवंडांबरोबर फुरफुर बाजा उडवताना पाहून सरीता आणि घरातले फार आनंदून गेले.हा
हळदी कुंकू कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा झाला.. एकमेकांचा आदर करत स्त्री यांनी एकमेकांना पाठिंबा दिला
हे हळदी कुंकूवाचे खरेखुरे वाण .. आणि त्यात होता खराखुरा मान!!
@। प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर
