Poonam Waghmare

Fantasy

3  

Poonam Waghmare

Fantasy

तो वाफाळलेला चहा आणि ती

तो वाफाळलेला चहा आणि ती

3 mins
275


   आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा त्याच रस्त्यावरुन जात होतो. त्या वाफळलेल्या चहातून निघणाऱ्या वाफा पुन्हा त्या टपरीवर मला खेचू लागल्या. मी ही जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या टपरीकडे वळलो. एक कटींग चहा घेऊन ग्लासातल्या धुराला फुंकर मारत चहाचा घोट घेतला आणि मान वर करुन पाहतो तर काय, त्या धुरामागे रेखा उभी होती. तिच्याही हातात चहाचा ग्लास होता. माझ्याकडे बघून हसत चहा घेत होती. नेहमी प्रमाणे खूप खुश दिसत होती.

रेखा - चहा कसला फक्कड झालाय ना, नेहमीप्रमाणे?


ती अनोळखी असल्यासारखी मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासाचं बसत नव्हता. मी गोंधळून इकडे तिकडे बघू लागलो, सगळं ok दिसत होतं. मी फोन काढून तारीख आणि वेळ पहिली, ते ही ठीक होत. पण रेखा कशी काय इथे? या विचाराने माझे मन गोंधळून गेले होते. कळत नव्हते की या प्रसंगाला कशाप्रकारे react व्हावं. तेवढ्यात रेखा म्हणाली

रेखा - काय रे अभय, काय झालं, इकडे तिकडे काय पाहतोयस, कुणाला शोधतोयस का?

मी - अ. काही नाही, कुणालाच नाही.

रेखा - मग चहा घे ना, नाहीतर गार होईल.

मी - हो, घेतो.

मी चहा संपवला, पैसे दिले आणि निघू लागलो. रेखा मला आवाज देऊन मागे येऊ लागली.

रेखा - अभय, अभय, अरे थांबना, असा का निघून चाललास?

मी मागे वळून पाहिले तर रेखा खरचं माझ्या मागे येऊन मला थांबवत होती. ती पुन्हा मला विचारु लागली

रेखा - काय झालं अभय, चिडलायस का माझ्यावर?

मी - ( गोंधळून) नाही गं, असं काहीच नाही.

रेखा - मग असा का निघालास पुढे, काही बोलत पण नाहीस माझ्याशी?

मी - ( गोंधळूनच) नाही, काही नाही, चल निघुया.


आम्ही एकत्र चालू लागलो, मला काही समजेना झालं, रेखाने मला तिच्या नेहमीच्या बस स्टॉप वर सोडण्यासाठी सांगितले आणि मी डोक्यात आणि मनांत अनेक प्रश्न घेऊन तिच्याकडे पाहत चालत राहिलो. तितक्यात पाऊस सुरु झाला. काळोख ही पडू लागला होता. आडोसा घेण्यासाठी एकही जागा सापडत नव्हती. आम्ही तसंच भिजत भिजत चालत राहिलो. तिचा बस स्टॉप आला या आम्हाला आडोसा मिळाला. रेखाने आपल्या पर्समधून रुमाल काढला आणि आपला चेहरा पुसू लागली. मी ही तेच करत होतो. माझं लक्ष रेखाकडे गेले. ती खूप सुंदर दिसत होती. मला तो पहिला दिवस आठवला. ज्या दिवशी आमची पहिली भेट झाली. त्या दिवशी पण असाच जोरात पाऊस सुरु झाला होता, ती आणि मी एकाच ठिकाणी आडोश्याला उभे होतो. त्यावेळी जशी फुलासारखी नाजूक, सुंदर दिसत होती, तशीच आजही दिसत होती. तिचा गोरा रंग अजून खुलला होता.


पाऊस थांबल्यानंतर फांद्यावरुन गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे तिच्या केसातून गळणारे पाण्याचे थेंब माझ्या मनाला चिंब करीत होते. तिचा तो सडपातळ बांधा भिजलेल्या कपड्यांमध्ये खूप मोहक भावना देत होता. पुन्हा पुन्हा प्रेमात पडावे असं तीचं सौंदर्य आजही मला पुन्हा तिच्या प्रेमात पाडत होते.

इतकं सगळं घडत होतं तरीही मनात विचारांच्या लाटा उसळत होत्या. काय चाललंय काही समजत नव्हते. इतक्यात तिची बस आली आणि रेखा मला बाय बोलून बसमध्ये गेली. बस पुढे जाईपर्यंत आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy